Royal Entertainmentटॉप पोस्ट

ह्रतिक आणि कंगना यांचे भांडण आता बाॅक्स आॅफिसवर सुटणार

0

कंगना राणौतच्या मोस्ट अवेटेड चित्रपट असलेल्या मनिकर्णिका –  द क्विन आॅफ झांसीची प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे.  कंगनाचा हा चित्रपट 25 जानेवारी 2019 रोजी पर्दर्शित होणार असून, त्याच दिवशी ह्रितिक रोशनचा सुपर-30 हा चित्रपट देखील प्रद्रशित होणार आहे. त्यामुळे 2019 च्या प्रजास्ताक दिनाच्या वेळी प्रद्रशित होणाऱ्या या दोन्हीही मोठे चित्रपट एकमेंकाविरूध्द क्लॅश होणार आहेत.

मागील काही दिवसापासून कंगना आणि ह्रतिकमध्ये अनेक वाद चालू आहेत. त्यामुळे एकाच दिवशी प्रद्रर्शित होणाऱ्या दोघांच्या चित्रपटात कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Loading...

मनिकर्णिकाचे प्रोड्यूसर झी स्टूडिओने या चित्रपटाची तारिख ट्विट करत जाहीर केली.

मनिकर्णिकामध्ये कंगना रानी लक्ष्मीबाईची भुमिका साकारणार आहे. या चित्रपटात रानी लक्ष्मीबाईंनी कशाप्रकारे ब्रिटिशांविरोधात स्वतंत्र्यासाठी लढा दिला हे दाखवणार आहेत.  मनिकर्णिका एेतिहासिक घटनांवर आधारित असणार आहे.

तसेच याआधी चित्रपट समिक्षक तरण आर्दश यांनी या वर्षाच्या सुरूवातीला ह्रतिकच्या सुपर -30 ची तारिख जाहिर केली होती.

सुपर-30 ही आयआय़टीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवणाऱ्या आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात ह्रतिक आनंद कुमार यांची भुमिका साकारणार आहे.

आता दोन्ही स्टारमध्ये कोण बाजी मारणार की, कोणी तरी तारिख पुढे ढकलणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

तसेच नवाझऊद्दिन सिद्धिकीचा ‘ठाकरे’ हा 23 जानेवारी, इमरान हाश्मीचा ‘चिट इंडिया’ 25 जानेवारीलाच प्रदर्शित होणार आहे.

Loading...

अरे बापरे! 100 रुपयाच्या नव्या नोटेसाठी, ‘एटीएम’वर होणार 100 कोटी रुपयांचा खर्च

Previous article

OPINION | PM नरेंद्र मोदींनी No Confidence Motion च्या भाषणात या प्रश्नांची उत्तरे दिली असती, तर बरे झाले असते

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *