मुख्य बातम्या

राज्यात अजून किती डोळ्यांसमोर महिलांना उद्ध्वस्त होताना पाहायचं? चित्रा वाघ संतापल्या

0

मीरा भाईंदर येथील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये 20 वर्षीय विवाहितेवर सुरक्षारक्षकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यावरून भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राज्यात भगिनींनी किती संताप, शोक व्यक्त करत बसायचंय आणि डोळ्यांसमोर महिला, मुलींना उद्ध्वस्त होताना पाहायचं? राज्यात ३ पक्षांचे ३ मुख्यमंत्री आणि एक सुपर मुख्यमंत्री असलेल्या सरकारमध्ये याची दखल तरी कोण घेणार ही परिस्थिती आहे असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

राज्यात भगिनींनी किती संताप,शोक व्यक्त करत बसायचयं आणि डोळ्यांसमोर महिला मुलींना उध्वस्त होतांना पहायचं.SOP ची मागणी गेली४महिने सातत्याने सरकारकडे करतोय.इतर घटनेत तत्परता दाखवणारं सरकार महिलांवर होणार्या अत्याचारावर उदासीन कामाँ जिजाऊ,सावूमाई,रमाई,भिमाई फक्त भाषणांपुरतचं २/२
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 13, 2020

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “हे लिहीत असताना आग मस्तकात जातीये, पुन्हा क्वारंटाईन सेंटरमध्ये २० वर्षीय मुलीवर मीराभाईंदरला तिथल्या सुरक्षारक्षकांकडून बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली. राज्यात ३ पक्षांचे ३ मुख्यमंत्री आणि एक सुपर मुख्यमंत्री असलेल्या सरकारमध्ये याची दखल तरी कोण घेणार ही परिस्थिती आहे” असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख पडला महागात ; अब्रूनुकसानीचा कंगनाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल
अनिल देशमुखांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार आहे का ?
‘कोरोना व्हायरसचा नाश झाला’, कोरोनाचा कहर वाढत असताना भाजपचा नेता बरळला
महाराष्ट्रात ठाकरे सरकारचे अत्याचार वाढलेत केंद्राने लवकर हस्तक्षेप करावा – कंगना राणौत
ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात आता कंगनाचीही चौकशी होणार ; गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना कडक आदेश

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राज्यात अजून किती डोळ्यांसमोर महिलांना उद्ध्वस्त होताना पाहायचं? चित्रा वाघ संतापल्या InShorts Marathi.

‘तुम्ही फार मोठी चूक करताय… ‘ कंगनानं इशारा देत मुंबई सोडली

Previous article

नागपुरातील लॉकडाऊनबाबत महाविकास आघाडीतील मंत्र्यामध्ये मतभिन्नता

Next article

You may also like

Comments

Comments are closed.