Royal Entertainmentमुख्य बातम्या

अक्षय कुमारच्या व्हायरल लुकची चर्चा सोशल मीडियावर ‘हाऊसफुल’

0

बॉलिवूडमध्ये सुरू झालेल्या #MeToo च्या वादळात अनेक जण सापडले होते, दिग्दर्शक साजिद खानवर अभिनेत्री सलोनी चोप्रा आणि मनोरंजन क्षेत्रात काम करणार्‍या महिला पत्रकार करिश्मा उपाध्याय, अभिनेत्री रिचेल व्हाईट यांनी साजिदवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. त्यामुळे साजिद खानचा चित्रीकरण सुरू असलेला हाऊसफुल 4 हा सिनेमा चांगलाच चर्चेत आला होता.

आता पुन्हा सोशल मीडियावर हाऊसफुल 4 ची चर्चा जोरात सुरू आहे, मात्र या वेळेला ही चर्चा मिटू विषयीची नसुन ती आहे अक्षय कुमारच्या नव्या लुकची.

Loading...

हाऊसफुल 4 च्या चित्रिकरणादरम्यानचा अक्षय कुमारचा एक वेगळा लुक सोशल मीडियावर सध्या भलताच व्हायरल होतोय. या लुकमध्ये अक्षय कुमार मुंडन केलेल्या अवतारात आहे. बाजीराव मस्तानीमधील रणबीर सिंगच्या लुकशी अक्षय कुमारच्या या नव्या अवताराचे साधर्म्य असल्याची चर्चा होती आहे. अक्षयच्या या अशा लुकवरून काहीतरी ऐतिहासिक संदर्भ फिल्ममध्ये असल्याचं समजतंय.

शिवाय साजिद खानने या आधी आपल्या सोशल मीडियावरून चित्रपटाच्या राजस्थानातील शूटिंग संपल्यानंतरचे फोटोज ही शेअर केले होते. सोशल मीडियावर फॅन्सद्वारे या नव्या लुकबद्दल चांगलीच चर्चा असल्याचं समजतंय.

(Akshay Kumar look in housefull 4)

(Akshay Kumar look in housefull 4)

 

नाना आणि साजिदची सिनेमातून एक्झिट –

#MeToo च्या वादात सापडलेले अभिनेते नाना पाटेकर आणि दिग्दर्शक साजिद खान या दोघांनीही चित्रपटातून काढता पाय घेतल्याचं समजतंय, त्यामुळे फराहाद समजी हे या चित्रपटाचे नवे दिग्दर्शक असणार आहेत. या आधी त्यांनी हाऊसफुल्ल 3 चे दिग्दर्शन केले होते. मात्र नाना पाटेकरांऐवजी कोण भूमिका साकारणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अक्षय कुमार व्यतिरिक्त या सिनेमात रितेश देशमुख ,बॉबी देओल,पुजा हेगडे, क्रिती सेनॉन, जॉनी लिव्हर, चंकी पांडे अशी स्टारकास्ट आहे.


हे ही वाचा – 

आजपासून अलाहाबादची ओळख ‘प्रगायराज’; योगीसरकारचा निर्णय

Pro Kabaddi :- हरियाणा स्टिलर्स विरुद्ध जयपूर पिंक पॅंथर; दोन्ही मातब्बर संघांची प्रतिष्ठा पणाला

नवरात्री स्पेशल : लहान गरीब मुलांसाठी ‘ती’ करते सढळ हाताने मदत, केला नोकरीचा त्याग!


 

Loading...

कॉंग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा,सायंकाळी होणार भाजपाप्रवेश

Previous article

संतापजनक ! कौमार्य चाचणीला नकार दिल्यानं दांडिया खेळायला विराेध

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *