खेळटॉप पोस्ट

Hockey Champions Trophy 2018: भारताने पाकिस्तानला 4-0 ने दिली मात

0

नेदरलॅंड येथे सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये आजच्या सामन्यात प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4-0 ने पराभव करत स्पर्धेची शानदार सुरूवात केली.

पहिला क्वार्टरमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही. भारताने चांगला खेळ केला. भारताला पेनल्टी काॅर्नर देखील मिळाले होते ; पण भारताला गोल करण्यात अपयश आले.  दुसऱ्या क्वार्टरमध्ये रमनदिपने 25 व्या मिनिटाला गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

Loading...

चौथ्या क्वार्टरमध्ये 17  वर्षीय दिलप्रीतने 54 व्या मिनिटाला गोल करत भारताला 2-0 ने आघाडी मिळवून दिली.

तिसरे सत्र पाकिस्तानच्या नावावर राहिले. त्यांनी आक्रमक खेळ करत अनेक वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी भारतीय डिंफेस चांगला खेळ करत त्यांना गोल करण्याची संधी दिली नाही.

पाकिस्तानने शेवटची 6 मिनिटे बाकी असताना त्यांचा गोल किपर इमरान भट्टला बाहेर बसवले. त्यांनतर पुढच्याच मिनिटाला मनदिप सिंगने आणखी एक गोल करत भारताला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली.त्यानंतर सामन्याच्या शेवट्या मिनिटाला ललित उपाध्यायने आणखी एक गोल करत भारताला 4-0 असा विजय मिळवून दिला.

संपुर्ण सामन्यात पाकिस्तानला एकही गोल करता आला नाही.

भारताचा पुढील सामना हा अर्जेंटीना बरोबर उद्या होणार आहे.

Loading...

‘बँक ऑफ महाराष्ट्र’ प्रकरण पोलिसांना चांगलेच भोवले

Previous article

महाराष्ट्र स्वच्छतेत देशात अव्वल परंतू पिंपरी-चिंचवड स्वच्छतेबाबत निष्कामी

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ