खेळटॉप पोस्ट

Hockey Champions Trophy 2018: भारताचा हाॅकी चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनलमध्ये प्रवेश, नेदरलॅंडविरूध्दचा सामना ड्राॅ

0

नेदरलॅंड येथे सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये आजच्या मॅचमध्ये भारत विरूध्द नेदरलॅंडचा सामना 1-1 असा ड्राॅ झाला. याच बरोबर भारताने चॅम्पियन्स ट्राॅफी 2018 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

आजच्या मॅचमध्ये दोन्ही संघानी उत्तुम खेळ केला. सुरूवातीच्या तीन सत्रात दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही. मॅचमधील दोन्ही गोल हे शेवटच्या सत्रात झाले.

Loading...

47 व्या मिनिटाला मनदीप सिंगने केलेल्या गोलने भारताने 1-0 अशी आघाडी घेतली. त्याच्यानंतर लगेचच नेदरलॅंडच्या थिएरी ब्रिंकमेनने 55 व्या मिनिटाला गोल करत 1-1 अशी बरोबरी केली.

त्यानंतर शेवटच्या मिनिटाला नेदरलॅंडने आणखी एक गोल केला. पण अंपायरने नकार दिला. व सामना 1-1 असा ड्राॅ राहिला. याच बरोबर भारताने चॅम्पियन्स ट्राॅफी 2018 च्या फायनल मध्ये प्रवेश केला.

फायनलमध्ये भारताचा सामना वल्ड नंबर वन आॅस्ट्रेलियाशी होणार आहे. तसेत या स्पर्धेत भारताला एकदाच हार पत्करावी लागली असुन ती हार आॅस्ट्रोलियाकडून स्विकारावी लागली आहे.

(photo courtesy :- Facebook/HockeyIndia)

Loading...

मराठा मोर्चाचा पुन्हा एल्गार; उच्च न्यायलयात मराठा आरक्षणाबाबत सुनावणी

Previous article

FIFA WC 2018 : अर्जेटिना स्पर्धेतून बाहेर, फ्रांसचा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ