खेळटॉप पोस्ट

Hockey Champions Trophy 2018: पुन्हा 2016 ची पुर्नावृत्ती, भारतावर मात करत आॅस्ट्रोलियाने 15व्यांदा कोरले चॅम्पियन्स ट्रॅाफीवर नाव

0

नेदरलॅंड येथे सुरू असलेल्या हाॅकी चॅम्पियन्स ट्रॅाफीच्या आजच्या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या फायनल मॅचमध्ये आॅस्ट्रोलियाने भारताचा शुटआउट मध्ये 1-1(3-1) असा पराभव केला. या विजयाबरोबरच आॅस्ट्रोलियाने 2018 च्या चॅम्पियन्स ट्रॅाफीवर नाव कोरले. आॅस्ट्रोलियाचे हे 15 वे चॅम्पियन्स ट्रॅाफी विजेतेपद आहे.

आजच्या मॅचमध्ये पुर्ण वेळेत 1-1 अशी बरोबरीत राहिली. आॅस्ट्रोलियाच्या गोवर्सने पेनल्टी काॅर्नरवर 25 व्या मिनिटाला गोल संघाचे खाते उघडले. त्यानंतर भारतातर्फे विवेक प्रसादने 43 व्या मिनिटाला गोल करत 1-1 अशी बरोबरी साधली.

Loading...

अखेर शेवटच्या हाफमध्ये एकही संघाला आघाडी घेता आली नाही. त्यामुळे मॅच शुटआउटमध्ये गेली. आॅस्ट्रोलियाच्या झॅलेस्विकी, डॅनी बेल आणि एडवर्डसने तीन गोल केले तर भारतातर्फे फक्त मनप्रीतने शुटआउटमध्ये गोल केला. ललीत, सरदार सिंग हे गोल करण्यात अपयशी ठरले शेवटी आॅस्ट्रोलियाने चॅम्पियन्स ट्रॅाफीवर नाव कोरले.

या स्पर्धेत भारताला एकदाच हार पत्करावी लागली होती ती हार आॅस्ट्रोलियाकडून स्विकारावी लागली होती व आता फायनलमध्ये पुन्हा भारताला आॅस्ट्रोलियाकडून पराभव स्विकारावा लागला आहे.

2016 च्या चॅम्पियन्स ट्रॅाफीमध्ये देखील भारताला आॅस्ट्रोलियाकडून शुटआउटमध्येच 3-1 ने पराभव स्विकारावा लागला होता.

भारताला आजपर्यंत एकदाही चॅम्पियन्स ट्रॅाफीचे विजेतेपद मिळवता आलेले नाहीये.

याआधी आॅस्ट्रोलियाने 1983, 1984, 1985, 1989, 1990, 1993, 1999, 2005, 2008, 2009, 2010, 2011, 2012, 2016 अशा तब्बल 14 वेळा चॅम्पियन्स ट्रॅाफीवर नाव कोरले आहे.

Loading...

रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाला हरवून उरुग्वेचा 2-1 असा रोमांचकारी विजय

Previous article

FIFA WC 2018 : रशिया-क्रोएशियाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, पेनल्टी शुटआउटमध्ये दोन्ही संघाचा विजय

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ