खेळटॉप पोस्ट

Hockey Champions Trophy 2018: आॅस्ट्रोलियाची भारतावर 3-2 ने मात, भारताची स्पर्धेतील पहिली हार

0

नेदरलॅंड येथे सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये आजच्या सामन्यात मॅचमध्ये आॅस्ट्रोलियाने भारताचा 3-2 ने पराभव केला. शेवटच्या मिनिटापर्यंत भारताच्या आशा कायम होत्या पण अखेर निर्णायक क्षणी आॅस्ट्रोलियाने भारताचा पराभव केला. भारताची ही या स्पर्धेतील पहिलीच हार आहे.

मॅचच्या सुरूवातीपासून आॅस्ट्रोलियाच्या संघाने आक्रमक खेळ केला.  मॅच सुरू होताच पाच मिनिटाच्या आताच आॅस्ट्रोलियाच्या लचान शार्पने गोल करत आॅस्ट्रोलियाचे खाते उघडले. त्यानंतर पहिले सत्र संपायला 6 मिनिटे बाकी असताना वरूण कुमारने भारताकडून गोल करत संघाला बरोबरी मिळवून दिली. 14 व्या मिनिटाला आॅस्ट्रोलियाच्या टाॅम क्रेगने आणखी एक गोल करत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

Loading...

त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये आॅस्ट्रोलियाच्या ट्रेंट मिटोंनने 33 व्या मिनिटाला गोल करत 3-1 आघाडी घेतली. भारताला अनेक पेनल्टी काॅर्नर मिळाले पण त्यांना गोल करता आले नाही.

आॅस्ट्रोलियाच्या संघाने संपुर्ण सामन्यात आक्रमक खेळ केला. श्रीजेश ने जर आॅस्ट्रोलियाला अनेक वेळा गोल करण्यापासून रोखले. जर अर्ध्या पेक्षा सुध्दा कमी गोल रोखले नसते तर भारतावर 2-3 गोल अधिक झाले असते. श्रीजेशने उत्तम गोलकिपिंग केली.

58 व्या मिनिटाला अखेर हरमनप्रीतने पेनल्टी काॅर्नरवर गोल करत आघाडी 2-3 अशी कमी केली. त्यानंतर आणखी एक पेनल्टी काॅर्नर भेटला पण हरमनप्रीतला गोल करता आला नाही व भारताला 2-3 असा पराभव स्विकारावा लागला.

याआधी झालेल्या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा 4-0 ने तर, अर्जेटिनाचा 2-1 ने पराभव केला होता.

Loading...

‘भारत महिलांसाठी जगातील सर्वात असुरक्षित देश’ थॉमसन रॉयटर्सचा अहवाल; राष्ट्रीय महिला आयोगा’ने फेटाळला

Previous article

सुजात बुखारींच्या मारेकर्‍यांची ओळख पटली, पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या सहभागाची शक्यता

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ