Royal Entertainmentमुख्य बातम्या

माधवनच्या वाढदिवसानिमित्त त्याची जीवनकथा 

0

‘रेहना है तेरे दिल में’ मधील म्ॅडी म्हणजेच आर. माधवनचा आज 49 वर्षाचा झालाय.  तो बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सुपरस्टार आहे. माधवनचे पूर्ण नाव रंगनाथ माधवन असे आहे. अभिनेता म्हणून ओळख असणाऱ्या  माधवनला प्रत्यक्षात आर्मी जॉईन करायचं होतं. मात्र,  आज त्याची अभिनेत्यासोबतच लेखक, दिग्दर्शक व सूत्रसंचालक अशी ओळख सर्वाच्याच परिचयाची आहे त्याने चित्रपटसृष्टीत स्वतःच्या हिंमतीवर आपले स्थान निर्माण केले आहे.

आर. माधवनचे वडील टाटा स्टील कंपनीत मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह होते आणि आई सरोज बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर होती. त्याला एक बहिण देखील आहे. तिचे नाव आहे देविका रंगनाथन. देविका युकेमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीयर आहे. माधव अभ्यासात अव्वल होता. १९८८ साली त्याला त्याच्या शाळेतून कल्चरल अॅम्बेसिडर म्हणून कॅनडामध्ये रिप्रेझेंट करण्याची संधी मिळाली होती. या व्यतिरिक्त माधवन एनसीसीचा चांगला कॅडेटदेखील होता. त्याला महाराष्ट्रातून बेस्ट कॅडेटने सन्मानितदेखील केले आहे. एनसीसीसी कॅडेटच्या माध्यमातून त्याला इंग्लंडला जाण्याची देखील संधी मिळाली होती. तिथे त्याने ब्रिटीश आर्मी, रॉयल नेवी व रॉयल एअर फोर्समधून ट्रेनिंग घेतली.  असे त्याचे वैयक्तिक आयुष्य होते.

Loading...

सुरूवातीच्या काळात ‘बनेगी अपनी बात’ ‘तोल मोल के बोल’ ‘घर जमाई’ या टिव्ही सिरीयलमध्ये काम केले.  माधवन  ‘रंग दे बसंती’, ‘3 इडियट्स’, ‘तनु वेड्स मनु’ ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ अशा प्रसिद्ध चित्रपटातून चाहत्यांना दिसला.

Loading...

अजय देवगणने केले नाशिकमध्ये वडिलांच्या अस्थींचे विसर्जन

Previous article

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका बंद करण्यासाठी शिवसेना भाजप कडून दबाव ?

Next article

You may also like

Comments

Comments are closed.