Royal Entertainmentमुख्य बातम्या

2 तासांचा ‘हिरकणी’ 2 मिनिटांच्या नृत्यातून; सोनालीने शेअर केला खास व्हीडियो

0

मुंबई- अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या हिरकणी या शौर्यपटाला प्रेक्षकांनी मनमुराद दाद दिली. या चित्रपटासाठी सोनालीला अनेक अवॉर्ड देखील मिळाले. तिच्या आयुष्यातली लक्षात राहणारी भूमिका प्रसाद ओकने तिच्या पदरात पाडली, असं ती हिरकणी चित्रपटातील भूमिकेबाबत नेहमी बोलते.
एवढी ग्लॅमरस आणि बिंधास्त सोनाली हिरकणीच्या भूमिकेत दिसणार असं ज्यावेळी जाहीर झालं होतं. त्यावेळी अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. ही भूमिका सोनाली व्यावस्थितरित्या पेलेल असं अनेकांना वाटलं नव्हतं मात्र सोनालीच्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली.
सध्या झी मराठीवरील युवा डांन्सिंग क्वीन साईज लार्ज फुल्ल चार्ज या वजनदार कार्यक्रमातील एका स्पर्धकाने सोनालीच्या हिरकणीच्या प्रवासाची आठवण करुन दिली. दोन तासांचा हिरकणी चित्रपट अवघ्या दोन मिनिटांच्या नृत्यामध्ये उत्तम रेखाटला. या नृत्याचा व्हीडियो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on Nov 7, 2020 at 4:37am PST

दरम्यान, सोनालीने मराठी इंडस्ट्रीत मोठमोठ्या भूमिकेला दाद दिली. नुकताच तिचा दुबईत साखरपुडा पार पाडला. आता चाहत्यांना आणि तिच्या मित्रमंडळींना लग्नाची उत्सुकता आहे.
The post 2 तासांचा ‘हिरकणी’ 2 मिनिटांच्या नृत्यातून; सोनालीने शेअर केला खास व्हीडियो appeared first on Dainik Prabhat.

या मुलीच्या फोटोत दडले आहे एक खतरनाक रहस्य, फोटो झूम करून पहा तुम्हाला नक्की समजेल !

Previous article

स्वतःसाठी वेळ काढा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.