खेळटॉप पोस्ट

सर्वात मोठी धावसंख्या, सर्वात मोठा विजय, सर्वात मोठा पराभव – एकाच मॅचमध्ये घडल्या अनेक गोष्टी

0

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ समजला जातो. इथे कोणताही विक्रम कधीही होऊ शकतो. टी-20 मध्ये 250 रन सहज बनवले जातात. 50 ओव्हरच्या मॅचमध्ये आता 400 रन देखील कमी वाटू लागले आहेत. न्यूझीलंडच्या महिला संघाने लगातार तीन मॅचमध्ये 400 पेक्षा अधिक धावा केल्या नंतर आता इंग्लंडच्या पुरूषांच्या संघाने वनडेमध्ये आॅस्ट्रोलियाविरूध्द खेळताना 481 रन्सचा डोंगर उभा केला.

आतापर्यंतची ही वनडेमधील सर्वात मोठी धावसंख्या आहे. इंग्लड संघाने त्यांचा 444 सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला आहे.

Loading...

आॅस्ट्रोलियाविरूध्द सुरू असलेल्या तिसऱ्या वनडे मॅचमध्ये इंग्लडने हा विक्रम केला. यामॅचमध्ये इंग्लंडतर्फे हेल्कस हेल्सने 147, जाॅनी बेरस्टाॅने 139, जेसन राॅयने 82 आणि कॅप्टन इयान माॅरगनने 67 रन्स केले. शेवटच्या 10 ओव्हरमध्ये इंग्लंडने तब्बल 150 रन्स केले. यामॅचमध्ये इंग्लडने तब्बल 62 बाॅंडींस मारल्या. हा सुध्दा एक रेकाॅर्ड ठरला आहे.

इंग्लंडच्या धावांचा पाठलाग करण्यास मैदानात उतरलेल्या आॅस्ट्रोलियाचा संघ 37 ओव्हरमध्ये 239 रन्सपर्यंतच मजल मारू शकला. आॅस्ट्रोलियातर्फे त्र्याविस हेडने 51, मार्कस स्टाॅयनिक्सने 44 रन्स केले.

आॅस्ट्रोलियाचा या मॅचमध्ये 242 रन्सनी पराभव झाला.  915 मॅचमध्ये झालेला हा आॅस्ट्रोलियन संघाचा सर्वात मोठा पराभव आहे. या आधी त्यांना 1986 साली न्यूझीलंडविरूध्द 206 रन्सनी पराभव स्विकारावा लागला होता.

या विजयाबरोबरच इंग्लंड संघाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय झाला आहे. याआधी त्यांनी 2015 साली न्यूझीलंडचा 210 धावांनी पराभव केला होता.

या विजयाबरोबरच इंग्लडने पाच वनडे मॅचच्या सिरीजमध्ये 3-0 ने आघाडी घेतली आहे. या विजयाबरोबरच एकाचमॅचमध्ये सर्वात मोठी धावसंख्या, सर्वात मोठा विजय, सर्वात मोठा पराभव, सर्वाधिक बाॅंड्रीस असे अनेक विक्रम झाले.

आस्ट्रोलिया संघाची वनडे मधील आयसीसी रॅंकिग ही सहाव्या स्थानावर घसरली असून, 34 वर्षांनंतर आॅस्ट्रोलियन संघाची रॅंकिग येवढी खाली घसरली आहे. या आधी 1984 साली आॅस्ट्रोलियाची टीम सहाव्या स्थानावर घसरली होती.

तसेच दोन्ही संघामध्ये पुढील मॅचही 21 जून व 24 जून रोजी खेळली जाणार आहे.

(PHOTO INPUT :- FACEBOOK/ICC)

Loading...

मेहबूबा मुफ्तींचा राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द

Previous article

पहा फोटो – अनुकृती वास बनली मिस इंडिया 2018

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ