Royal politicsमुख्य बातम्या

हाशीमपूरा हत्याकांड :- 42 मुसलमानांच्या झालेल्या हत्येच्या गुन्ह्यात 16 पीएसी जवानांना जन्मठेप

0

दिल्ली हायकोर्टाने १९८७ साली झालेल्या हाशीमपूरा हत्याकांड प्रकरणात 42 मुस्लिमांच्या झालेल्या हत्येच्या गुन्ह्यात 16 पीएसी जवानांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

31 वर्षांपूर्वी मे 1987 मध्ये मेरठ जिल्ह्यातल्या हाशिमपुरामध्ये 42 जणांची हत्या झाली होती. न्यायाधीश एस मुरलीधर आणि न्यायाधीश विनोद गोयल यांच्या खंडपीठाने सबळ पुराव्याअभावी आरोपींना निर्दोष मुक्त केले होते.

Loading...

हायकोर्टाने आज प्रादेशिक आर्म्ड कॉन्स्टेबुलरीच्या (पीएसी) निवृत्त झालेल्या 16 जवानांना हत्या, हत्येचा प्रयत्न, पुराव्यांशी छेडछाड आणि आरोपींविरूद्ध कट रचण्याचे आरोप निश्चित केले होते.

या प्रकरणात 21 मार्च 2015 ला कनिष्ठ न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी या पीएसीच्या 16 आरोपींना निर्दोष मुक्त केले होते. या निर्णयाविरोधात यूपी सरकार, राष्ट्रीय मानवाधिकार, तसेच पीडितांच्या नातेवाईकांनी हायकोर्टात अपील केले होते. न्यायालयाने या अपीलवर सुनावणी देत आज 16 जणांना दोषी ठरवलं.

काय आहे हाशीमपूरा हत्याकांड प्रकरण?

1986 साली केंद्र सरकारने बाबरी मशिद खुली करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये वातावरण तापलं. 14 एप्रिल 1987 पासून मेरठमध्ये धार्मिक वातावरण तापण्यास सुरुवात झाली.

अनेक लोकांची हत्या करण्यात आली. दुकाने,घरे जाळण्यात आली. हत्या ,जाळपोळ लुटमारी अशी प्रकरणानं पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये घडत होती. वाट पाहूनही मेरठ शांत होत नसल्याने मेरठ शहरात संचारबंदी लागू केली. तसेच मिरज शहरात सैनिक तैनात करण्यात आले होते.

याच दरम्यान 22 मे 1987 साली पोलीस, पीएससी, मिलिट्रीने हाशिमपुरामध्ये शोध मोहीम चालवली.

मेरठमधील किशोरवयीन मुलांना,तरुणांना तसेच प्रौढांना मिळून शंभर जणांना ट्रकमध्ये घालून पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले असा आरोप पीएसी जवानांवर करण्यात आला होता. संध्याकाळी या जवानांनी 50 जणांना ट्रकमधून दिल्ली रोड मुरादनगर गंग नहर या ठिकाणी नेऊन 50 जणांना एक एक करून गोळी मारून गंग नहरमध्ये फेकून दिले.

या घटनेत ५० जणांवर करण्यात आलेल्या गोळीबारात ८ जणांचा जीव वाचला.

Loading...

रिलीजपूर्वीच शाहरुख खानच्या ‘झिरो’ ने कमावले 100 कोटी

Previous article

राफेलची किंमत किती हे 10 दिवसात सादर करा – सर्वोच्च न्यायालय

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *