Royal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्या

दोन झुंजार नेत्यांची भेट …चर्चा तर होणारचं

0

औरंगाबाद :   शिवस्वराज्य बहुजन पक्षाच्या माध्यमातून आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करण्याच्या तयारीत असलेले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबादमध्ये प्रहार शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांची भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. आधी सुभेदारी विश्रामगृह आणि नंतर हॉटेल ताज मध्ये जाऊन रविवारी रात्री गुप्त भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Loading...

एका बाजूला बच्चू कडू यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव यांचे सासरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना आव्हान दिले आहे. तर दुसऱ्या बाजूला जाधव औरंगाबादमधून लोकसभा लढवण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी हर्षवर्धन जाधव यांनी बच्चू कडू यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता का शेतकरी व त्यांच्या प्रश्नांचा पुळका येतो ?- बच्चू कडू

Loading...

पक्ष बदलण्यासंदर्भात आ.भारत भालके यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Previous article

गोव्यात नव्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत विश्वजित राणे; कॉंग्रेसच्या दोन आमदारांची भाजप प्रवेशाची शक्यता

Next article

You may also like

Comments

Comments are closed.