Royal politicsटॉप पोस्ट

मेहसाणा दंगलप्रकरण- हार्दिक पटेल यांना 2 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

0

गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता म्हणून ओळखल्या जाणार्‍या  हार्दिक पटेल यांना गुजरातमध्ये दंगल प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवत 2 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

मागील 2 वर्षापूर्वी  पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसह हार्दिक पटेल यांनी गुजरात मध्ये मोठ्या आंदोलनाला सुरुवात केली होती.  त्याला समाजाचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतू याच दरम्यान मेहसाणा  दंगल घडून मोठा हिंसाचार झाला होता. याचप्रकरणी न्यायलयाने हार्दिक पटेल यांना 2 वर्षाची शिक्षा आणि 50 हजार रुपये दंड ठोठावला आहे. परंतू त्यांना लगेचच जामीन देखील मिळाला. 

Loading...

याच दंगलीमध्ये भाजप आमदार ऋषिकेश याचे कार्यालयाची मोडतोड करण्यात आली होती. का कारणाने देखील हार्दिक पटेल यांना दोषी ठरवण्यात आले आहे. यात दोषी आढळलेल्या 14 जणांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे, तर हार्दिक पटेल याच्या समवेत आणखी 3 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे.

न्यायालयाने दिलेल्या या निकालानंतर हार्दिक यांनी ट्विट केले आहे की, प्रश्न कोणताही असो, तो आहे त्याच परिस्थितीत सुटू शकत नाही, तर त्यासाठी त्याची मोठी चर्चा होणे गरजेचे असते. तरच त्यावर तोडगा निघू शकतो.  इंकलाब  झिंदाबाद.. 

याच दंगली वेळी हार्दिक पटेल यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पाटीदार आरक्षण आंदोलन समितीने (पीएएएएस) बंद ची हाक दिली होती, या वेळी आंदोलन आणि हिंसाचार वाढत असल्याने गुजरात मधील राजकोट, सूरत, मेहसणा येथील इंटरनेट सेवा बंद केली होती. एवढाच नाही तर लोकांनी या आंदोलनात इमारती देखील जाळल्या होत्या आणि पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड केली होती. लोकांकडून वाढत असलेली हिंसा पाहून पोलिसांकडून अश्रू धुराचा मारा करण्यात आला होता. तर काही ठिकाणी  लाठीचार देखील करण्यात आला होता. आंनियंत्रित लोकांना आवर घालण्यासाठी मेहसणा मध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला होता.

हार्दिक पटेल यांची सुटका करण्यात यावी यासाठी आणि पटेल समाजाला आरक्षण देण्यासाठी जेलभरो आंदोलन देखील करण्यात आले होते.

परंतू आता हार्दिक पटेल यांच्याकडून पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आणि नुसत आंदोलन करून ते थांबणार नसून अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसणार आहे. त्यांनी संगितले की ते तोपर्यंत उपोषण करतील जो पर्यंत त्यांना आरक्षण मिळणार नाही, ते 25 ऑगस्ट पासून अनिश्चित काळासाठी उपोषणाला सुरुवात करणार आहेत.  असे त्यांनी ट्वीटर वर पोस्ट शेअर करत संगितले आहे. 

Loading...

मराठा आरक्षण : मराठा क्रांती मोर्चाकडून बंद मागे, शांतता राखण्याचे आवाहन

Previous article

OPINION | होय, मी मराठा आहे आणि मी हिंसेच्या विरोधात आहे

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *