Royal Entertainmentमुख्य बातम्या

हॅपिएस्ट माईंडस्‌चा आयपीओ सोमवारपासून खुला होणार

0

नवी दिल्ली : आयटी आऊटसोर्सिंग क्षेत्रातील बंगळूर येथील कंपनी हॅपिएस्ट माईंडस्‌ टेक्‍नॉलॉजीज या कंपनीचा आयपीए सोमवार दि. 7 सप्टेंबरपासून खुला होणार आहे. बंगळूरू येथे मुख्यालय असलेल्या यां कंपनीची स्थापना आयटी क्षेत्रातील ज्येष्ठ अशोक सुता यांनी केली आहे. आयपीओसाठी 165 ते 166 असा किंमत पट्टा ठेवण्यात आला आहे. सुता हे कंनपीचे प्रवर्तक आहेत. त्यांच्याकडील 84.14 लाख शेअर ते विकणार आहेत. त्याचबरोबर कंपनीतील गुंतवणूकदार सीएमडीबी हा खासगी इक्विटी फंडाकडे कंपनीचे 19.4 टक्के शेअर आहेत. हा फंड स्वतःची गुंतवणूक काढून घेणार आहे. या फंडाचे व्यवस्थापन जेपी मॉर्गन इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कंपनीतर्फे पाहिले जाते. बाकीचे शेअर कंपनीचा कर्मचारी ट्रस्ट आणि इतरांकडे आहेत. या आयपीओद्वारे कंपनीने 702 कोटी रुपये उभारण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. आयसीआयसीआय सिक्‍युरिटीज्‌, नोमुरा फायनान्शियल ऍडव्हाजरी हे या आयपीओचे व्यवस्थापक आहेत तर केएफइन टेक्‍नॉलॉजी रजिस्ट्रार आहे.
2016 नंतर आयटी क्षेत्रातील कंपनीचा आयपीओ प्रथमच येत आहे. 2016 मध्ये एल अँड टी इन्फोटेक कंपनीचा आयपीओ आला होता. त्याचबरोबर सुता संस्थापक असलेल्या दुसरी कंपनी आयपीओद्वारे गुंतवणूकदारांना सामोरी जात आहे. यापूर्वी सुता सहसंस्थापक असलेल्या माईंडट्री कंपनीचा आयपीओ 2000 मध्ये आला होता. नंतर त्यांनी माईंडट्री कंपनी सोडून हॅपिएस्ट माईंड कंपनीची स्थापना केली.
करोनाची साथीमुळे अनिश्‍चितता असली तरी हॅपिएस्ट माईंडसचा ईबीआयटीडीए 24 ते 25 टक्‍क्‍यांच्या दरम्यान राहिलेला आहे आणि भविष्यातील व्यवसाय वाढीबाबत कंपनीला आत्मविश्वास आहे. सुता यांच्या सांगण्यानुसार, जागतिक पातळीवर आयटीसाठी खर्च केल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या उगवत्या क्षेत्रांमधून आणि डिजिटल क्षेत्रातून कंपनीचा महसूल प्रामुख्याने येत आहे. त्यामध्ये यंदा वीस टक्‍क्‍यांनी वाढ होण्याची शक्‍यता आहे. 2020 या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल 698.2 कोटी रुपये होता आधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात 18.2 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.
The post हॅपिएस्ट माईंडस्‌चा आयपीओ सोमवारपासून खुला होणार appeared first on Dainik Prabhat.

फेसबूकने देशनिहाय मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात – रविशंकर प्रसाद

Previous article

भाजप आमदार राजा सिंहवर फेसबुकची कारवाई

Next article

You may also like

Comments

Comments are closed.