Royal Entertainmentमुख्य बातम्या

ऑक्टोबरमध्ये आयफोनप्रेमींना पर्वणी!

0

तुम्ही जर ऍपल कंपनीच्या आयफोनचे चाहते असाल तर  ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला कंपनीकडून एक छान भेट मिळू शकते. कारण ‘आयफोन 12’ मिनी ‘नावाच्या नवीन मालिकेत ऍपल आपला सर्वात छोटा फोन रिलीज करणार आहे. यासह कंपनी पुढील महिन्यात चार नवीन आयफोन बाजारात आणण्याची अपेक्षा आहे.
आयफोनच्या नवीन मॉडेलमध्ये 5.4 इंचाचा स्मार्टफोन तुमच्या हाती येईल. शिवाय दोन 6.1 इंचाचे मॉडेल आणि एक 6.7 इंचाचा फोनही ऍपल सादर करणार आहे. माहितीनुसार,  5.4 इंचाचा आयफोन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन असेल आणि त्याला आयफोन मिनी म्हटले जाईल.
आजच्या मानकानुसार हा स्मार्टफोन सगळ्यात छोट्या स्क्रीनचा ठरू शकतो. अन्य दोन मॉडेल्स आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्स म्हणून ओळखल्या जातील.  आयपॅड मिनी, मॅक मिनी आणि आयपॉड मिनीवर पाहिलेला आयफोन 12 मिनी “मिनी” नामाभिधान असलेला पहिला आयफोन असेल.
आयफोन 11 प्रो या 5.8 इंचाच्या डिव्हाइसपेक्षाही 5.4 इंच असणारा आयफोन 12 मिनी लहान असेल.  बहुप्रतिक्षित आयफोन 12 मालिका सुरू करण्यासाठी ही दिग्गज कंपनी 13 ऑक्टोबर रोजी एक विशेष कार्यक्रम आयोजित करेल.
चारही आयफोन मॉडेल्समध्ये ओएलईडी डिस्प्ले आणि 5 जी समर्थन असण्याची अपेक्षा आहे. अशा या बहुप्रतिक्षित ‘मिनी’ आयफोन खरेदी करण्यासाठी आपला खिसा मात्र ‘मॅक्सिमम’ मोठा ठेवावा लागणार आहे.  आयफोन 12 ची अंदाजे किंमत  699  ते 749 डॉलर दरम्यान असू शकते, तर आयफोन 12 मॅक्सची किंमत 799 ते 849 डॉलर असू शकते. प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल्सची किंमत 1,100 डॉलर ते 1,200 डॉलर असणे अपेक्षित आहे.
The post ऑक्टोबरमध्ये आयफोनप्रेमींना पर्वणी! appeared first on Dainik Prabhat.

ऑक्टोबरमध्ये आयफोनप्रेमींना पर्वणी!

Previous article

व्हिडीओ काॅन्फरन्सिंग अ‍ॅप ‘गूगल मीट’ संदर्भात गूगलचा मोठा निर्णय

Next article

You may also like

Comments

Comments are closed.