Royal Entertainmentमुख्य बातम्या

100 कंपन्यांचे चिनी नागरिकांकडून हॅकिंग

0

भारत सरकारच्या वेबसाईटमध्येही केली होती छेडछाड
वॉशिंग्टन – अमेरिकेतील आणि विदेशातील सुमारे 100 कंपन्या आणि संस्थांमध्ये हॅकिंग केल्याबद्दल अमेरिकेतील न्याय विभागाने 5 चिनी नागरिकांवार हॅकिंगचे आरोप ठेवले आहेत.
या चिनी नागरिकांवर भारत सरकारच्या संपर्कातील कंपन्यांमध्ये हॅकिंग करून मोलाचा सॉफ्टवेअर डाटा आणि उद्योगांशी संबंधित गोपनीय माहिती चोरल्याचाही आरोप आहे.
अमेरिकेतील डेप्युटी ऍटर्नी जनरल जेफ्री रोसेन यांनी ही माहिती जाहीर केली. पाच चिनी नागरिकांनी मलेशियाच्या दोन नागरिकांसह मिळून हे हॅकिंग केले असल्याचे त्यांनी सांगितले.
मलेशियाच्या दोन नागरिकांना अटक करण्यात आली.
चिनी नागरिकांना फरार घोषित करण्यात आले असल्याचे न्याय विभागाच्या निवेदनामध्ये म्हटले आहे. या हॅकिंग प्रकरणावरून रोसेन यांनी चीन सरकारवरही जोरदार टीका केली आहे.
चिनी नागरिकांकडून होणाऱ्या या सायबर हल्ला आणि कॉम्प्युटर हॅकिंगच्या प्रयत्नाविषयी न्याय विभागाने सर्व शक्‍य त्या उपाययोजना अवलंबल्या आहेत. पण चायनीज कम्युनिस्ट पर्टीने या सायबर गुन्हेगारांना चीनबाहेर केलेल्या सायबर हल्ला आणि चीनला उपयोगी बौद्धिक संपदेच्या चोरीबद्दल चीनमध्ये सुरक्षित ठेवले जाते, असेही रौसेनी म्हणाले.
2019 मध्ये या सायबर हल्लेखोरांनी भारत सरकारच्या वेबसाईट हॅक केल्या होत्या. तसेच भारत सरकारला मदत करणारे महत्वाचे नेटवर्क आणि डाटाचे सर्व्हरही हॅक केले होते. ‘कोबाल्ट स्ट्राईक’ नावाचा व्हायरस भारत सरकारच्या संरक्षित कॉम्प्युटरमध्ये घुसवला होता.
The post 100 कंपन्यांचे चिनी नागरिकांकडून हॅकिंग appeared first on Dainik Prabhat.

100 कंपन्यांचे चिनी नागरिकांकडून हॅकिंग

Previous article

ऍन्ड्रॉईड मोबाइलमध्ये ‘ब्लॅक रॉक’ नावाचा व्हायरस

Next article

You may also like

Comments

Comments are closed.