Royal politicsटॉप पोस्ट

आधारकार्ड नंबर देऊन हॅक करण्याचे दिले होते आवाहन; हॅकर्सने केले 1-1 रुपये बँक खात्यात जमा

0

‘सामान्य माणसाचा अधिकार’ अशी टॅग लाईन असलेले आधार क्रमांक किती सुरक्षित आहे असे तुम्हाला वाटते? भारतातील ट्राय या संस्थेचे प्रमुख आर एस शर्मा यांच्या बँक खात्यावर आधार कार्डच्या साहाय्याने काही हॅकर्सने अक्षरशः 1-1 रुपया जमा केला. आहे ना आश्चर्याची घटना. पण ही खरी आहे.

झाले असे की, ट्राय चे प्रमुख आर एस शर्मा यांनी आपला आधारकार्ड क्रमांक ट्विटर वर टाकत हॅकर्सला आधार कार्ड हॅक करण्याचे चॅलेंज दिले होते. आणि ट्विटर वरील काही ऍक्टिव्ह एथिकल हॅकर्सने हे चॅलेंज स्वीकारले आणि काही मिनिटात आर एस शर्मा यांची वैयक्तिक माहिती ट्विटर वर ट्विट केली.

Loading...

शर्मा यांनी ट्वीटरवर चॅलेंज दिले की, हा माझा आधार कार्ड क्रमांक आहे- 7621 7768 2740 .  आता मी तुम्हाला एक चॅलेंज देतो की, मला एक ठोस कारण द्या ज्याने तुम्ही मला धोका पोहचवू शकतात. आर. एस शर्मा यांचे हे चॅलेंज स्वीकारून अनेक हॅकर्स पुढे आले आणि त्यांनी आर. एस शर्मा याची सर्व वैयक्तिक माहिती हॅक झाली असल्याचे सांगत त्यांची माहिती त्यांना दिली देखील. ट्वीटर वर अॅक्टिव काही हॅकर्सनी त्यांना त्यांचा मोबाइल नंबर, फोटोग्राफ, घरचा पत्ता, जन्मतारीख अशी माहिती उघड केल्याचा दावा करीत त्यांना ही माहिती रिट्विट केली.

माहिती हॅक झाली असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर शर्मा यांनी ट्विट केले की, ‘मी त्यांना माझा मोबाइल नंबर आणि इतर माहिती देण्याचे चॅलेंज दिले नव्हते, मी त्यांना या माहितीच्या आधारावर मला धोका पोहचवण्याचे चॅलेंज दिले होते. त्यांना त्यात काही जास्त यश आल्याचे दिसत नाही. त्यांना शुभेच्छा.’

या नंतर या हॅकर्स ने शर्मा यांच्या बँक अकाउंट वर पेटीएम च्या माध्यमातून अक्षरश 1 – 1 रुपया टाकला. आणि दाखवून दिले की त्यांचे आधार कार्ड किती सुरक्षित आहे.

शर्मा हे यूआयडीएआय (युनिक आयडेंटिफीकेशन अॉथेरीटी ऑफ इंडिया) चे माजी संचालक होते. आणि ते आधार योजनेचे समर्थन करतात.  त्यांनी पुढे ट्विट केले की, ‘डिजिटल जगात माहिती गोपनीयता अत्यंत मोठी आणि महत्वाची समस्या आहे. आणि मी देखील त्याच्या समर्थनात आहे. परंतू माझे एवढेच सांगणे आहे की आधार कोणत्याही गोपनीय महितीचा भंग करत नाही.’
Loading...

आसाममधील 40 लाख लोक होऊ शकतात बेघर? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Previous article

मराठा आरक्षण : – चाकण – सोलापूर पेटलं, पुण्यात पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश लागू

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *