Royal Entertainmentमुख्य बातम्या

डेंगूसह इतर तापाच्या आजारावर रामबाण औषध.. जाणून घ्या गुळवेलचे फायदे..

0

सध्या कोरोना महामारीमुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये सारी या आजाराने डोके वर काढले आहे. यामध्ये आता पावसाळ्यात डेंगू मलेरिया सुद्धा डोके वर काढत आहे. तसेच हिवाळ्यामध्ये देखील डेंग्यू आणि तापाचे आजार मोठ्या प्रमाणात डोके वर काढू शकतात.
आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवावी. आपण या आजारापासून दूर राहू शकतो. तसेच रक्तातील पेशी वाढवण्यासाठी देखील आपण काही वनस्पतीचा वापर करून यावर मात करू शकतो. डेंगू झाल्यावर डॉक्टर वेगवेगळे अँटिबायोटिक औषधे घेऊन आपला ताप करणे करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, असे होऊन देखील काही जणांना या आजारापासून मुक्तता मिळत नाही. त्यामुळे आपण नैसर्गिक पद्धतीने उपाय केल्यास आपल्याला याचा चांगला फायदा होऊ शकतो.
भारतामध्ये अनेक अशा वनस्पती आहेत की, त्याचा वापर आयुर्वेदामध्ये होतो. तसेच अनेक वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे अश्या औषधी या आपण सातत्याने वापरल्या पाहिजेत. आम्ही आपल्याला आज गुळवेल या औषधीबाबत माहिती देणार आहोत. या औषधीमुळे अनेक फायदे होत असल्याचे समोर आले आहे. चला तर मग जाणून घेऊया या औषधी चे फायदे..
१. ताप कमी करते : गुळवेल ही वनस्पती खाल्ल्यावर आपल्याला याचे अनेक फायदे मिळतात. डेंगूच्या आजारांमध्ये या वनस्पतीचा अतिशय चमत्कारिक फायदा होतो. रक्तातील पेशी वाढवण्यासाठी गुळवेल खूप मोठ्या प्रमाणात मदत करते. तसेच इतर ताप असेल तरीदेखील गुळवेलने ताप कमी होतो. डेंग्यूचा ताप या वनस्पतीने लवकरात लवकर कमी होतो.
२. हाडांचे आजार :अनेकांना हाड दुखी समस्या मोठ्या प्रमाणात असते. गुळवेलचा वापर करून आपण हाड दुखीची समस्या कमी करू शकतो. तसेच यामुळे आपली प्रतिकारशक्तीही मोठ्या प्रमाणात वाढते.
३. भूक लागणे: अनेकांना भूक न लागण्याची समस्या मोठ्या प्रमाणात असते. विविध उपचार केल्यानंतर देखील अशा लोकांना लवकरात लवकर भूक लागत नाही. त्यामुळे गुळवेलचा वापर करून आपण भूक वाढीसाठी प्रयत्न करू शकता.
४. खोकला: अनेकांना ऋतू बदलला की खोकल्याची समस्या मोठ्या प्रमाणात असते आणि औषधे घेतल्यानंतर देखील खोकला कमी होत नाही. त्यामुळे गुळवेल चा वापर करून आपण खोकला कमी करू शकतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.
The post डेंगूसह इतर तापाच्या आजारावर रामबाण औषध.. जाणून घ्या गुळवेलचे फायदे.. appeared first on Marathi Entertainment.

तुमच्या आवडत्या सईचा IPLच्या या टीमला ‘फुल्ल सपोर्ट’

Previous article

वास्तु टिप्स:चुकुनही नसावी घरातील पलंगासमोर ही गोष्ट,राहत नाही माता लक्ष्मीचा वास

Next article

You may also like

Comments

Comments are closed.