मुख्य बातम्या

मुगाचे भाव वाढले; मात्र हमीभावापासून शेतकरी वंचितच, पहा आजचे बाजारभाव

0

पुणे :केंद्र सरकारने हमीभाव जाहीर करून आपले कर्तव्य संपल्यागत हमीभाव या विषयाकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले आहेत. तर, राज्य सरकारने हा आपला विषयच नसल्याच्या थाटात याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी मुग उत्पादक शेतकरी बाजार समितीत लुबाडले जात आहेत.महाविकास आघाडी सरकारने करोना प्रश्नाच्या आड लपून इतर सर्वच महत्वाच्या प्रश्नांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्याचवेळी केंद्रातील सरकार मोराच्या गोतावळ्यात ढिम्म आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिलेदारांनाही याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे. कारण, अभिनेता सुशांत सिंग याच्या आत्महत्येच्या मुद्यावर राज्य सरकारला जाब विचारणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे इतरही सहकारी मुग या पिकाच्या मुद्यावर मुग गिळून गप्पच आहेत. एकूणच यामुळे शेतकऱ्यांना वाली नसल्याचे चित्र पुन्हा एकदा अधोरेखित झालेले आहे.ADVT : टीव्ही, फ्रीज, AC वर ५० टक्के सूट; पहा Amazon Wow Salary Days Sale चे डीटेल्सhttps://amzn.to/3gONdMnसध्या मागील आठवड्याच्या तुलनेते बाजारात मुगाचे सरासरी भाव १० टक्के वाढले आहेत. मात्र, तरीही ते काही ७१५० रुपये क्विंटलच्या कुठेही पुढे गेलेले नाहीत. अपवाद म्हणून काही ठिकाणी मोजके डाग त्या भावाने विकून मग इतरांचे मुग कमी भावाने खरेदी करण्याचा सपाटा व्यापाऱ्यांनी लावला आहे. त्याला बाजार समितीचा वरदहस्त आहे आणि लोकप्रतिनिधी नावाच्या बेजबाबदार मंडळींचाही..!बुधवार, दि २ सप्टेंबर २०२० रोजीचे मुगाचे प्रतिक्विंटलचे सरासरी भाव (रुपयांमध्ये) असे : भोकर ३८८५, कारंजा ४८१०, परळी वैजनाथ ५५००, जळगाव ६५००, वाशीम ५५००, पैठण ३५००, मलकापूर ५७००, परतूर ४९००, जळकोट ३६००, पुणे ७६००, उदगीर ५२००, परतीर ५१५०, देऊळगाव राजा ५५००, गंगापूर ३०००, मंठा ४५००, मुरूम ५२००, तुळजापूर ५६००, नांदुरा ७२००, देवळा ५४००, मुंबई ९००० आदि.संपादन : सचिन पाटीलस्पेशल ऑफर..रोटाव्हेटरसोबत दंड यंत्र फ्री..Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, August 9, 2020लॉकडाऊनमध्ये मिळाला बुस्ट; सेवाभाव जपत ‘लोकरंग’वाल्यांनी जिंकला नगरकरांचा विश्वासAmazon वर सेल; 70 टक्क्यापर्यंत सूट, पहा फॅशनचा जलवाझालाय शेतकरी हिताचा ‘सर्वोच्च’ निर्णय; पहा SC यांनी काय दिलेत सरकारला निर्देशफ़क़्त १६ वर्षांमध्ये ‘या’ कंपनीने दिला बम्पर मनी; १० हजारांचे झाले २१ लाख रुपयेTrending : झुकेर्बर्गला घाम फोडणारी ती सिनेटर होती हॉटेलमध्ये वेट्रेस; होय, वाचा तिची प्रेरणादायी स्टोरी

Breaking : म्हणून मोदींच्या ‘आरोग्य सेतू’ला मेट्रोने नियमातून वगळले..!

Previous article

कांद्याचे भाव स्थिरावले; पहा महाराष्ट्रात कोणत्या मार्केटमध्ये मिळतोय जास्त भाव ते

Next article

You may also like

Comments

Comments are closed.