Royal politicsटॉप पोस्टमहाराष्ट्रमुख्य बातम्या

ग्रामीण पोलीस ठाण्यांमधून नातेपुते पोलीस ठाणे अव्वल

0

सोलापूर 18 फेब्रुवारी (हिं.स) – पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे गुणांकन संकल्पनेनुसार जिल्ह्यातील पोलीस ठाणे व पोलीस उपविभागाच्या कार्यालयाचे एकूण कामकाजावरून केलेल्या गुणांकनाच्या आधारे जानेवारीमध्ये नातेपुते पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी प्रथम स्थान प्राप्त केले असून पंढरपूर शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक गवळी द्वितीय तर बार्शी तालुका पोलीस ठाणे सपोनि देशपांडे यांनी तृतीय क्रमांकाची कामगिरी बजावली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमध्ये डॉ.सागर कवडे पंढरपूर उपविभाग यांची प्रथम, मंगेश चव्हाण अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी यांची द्वितीय क्रमांकासाठी तर अक्कलकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यावलकर यांची तृतीय क्रमांकासाठी निवड झाली आहे.

Loading...

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयांमध्ये मासिक मिटिंगमध्ये या सर्वांचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केलेले आहे.

Loading...

❗ये शिवबा ये❗शिवजयंती साजरी करण्याच्या पद्धतीवर बोलकी कविता

Previous article

उमेश भोसले यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.