Royal politicsटॉप पोस्ट

लोकसेवा आयोगाची परीक्षा पास न होताच प्रशासकीय सेवेत होणार थेट भरती; केंद्र सरकारचा निर्णय

0

संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा पास न होता आता अनुभव असलेल्या लोकांची थेट भरती करून प्रशासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. या अनोख्या निर्णयानंतर संघ लोकसेवा आयोगाच्या निवड प्रक्रियेला छेद गेला आहे.

केंद्रसरकरच्या या निर्णयानंतर खासगी क्षेत्रात काम करणारे  आता कोणतीही परीक्षा पास न होता प्रशासकीय सेवेत भरती होऊ शकतात. यासाठी केंद्रसरकार ने 10 विविध विभागात संयुक्त सचिव पदांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात आली आहे.

Loading...

या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला असताना, सरकरकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे की, देशातील मंत्रालयांना देशातील जास्तीत जास्त अनुभवी लोकांचा लाभ होईल.

कृषिविषयक  सेवा, महसूल, रस्ते वाहतूक, वाणिज्य, पर्यावरण, नागरी हवाई सेवा, वनसेवा,अर्थविषयक विभाग अशा विविध क्षेत्रातील थेट भरतीसाठी केंद्र सरकारकडून जाहिरात काढण्यात आली आहे. राष्ट्र निर्माण च्या दिशेने योगदान देण्यासाठी इच्छुक असणार्‍या प्रतिभावान भारतीय नागरिकांकडून अर्ज मागवण्यात येत असल्याचे या जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.

थेट भरती साठी कोण पात्र ?

अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा किंवा संस्थेचा पदवीधर असावा, खासगी क्षेत्रातील उच्च पदावर काम करणारा, स्वायत्त संस्थेत वा सार्वजनिक क्षेत्रात काम केलेला,  किमान 15 वर्षाचा अनुभव असलेला उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करणार्‍या उमेदवारचे वय 1 जुलै 2018 ला किमान 40 वर्ष असायला हवे.

निवड झालेले उमेदवारांचा कार्यकाळ करारानुसार 3 वर्षाचा असेल त्यानंतर कामगिरी पाहून हा कार्यकाळ 5 वर्षापर्यंत वाढवण्यात येईल.

राजकीय नेत्यांची टीका-

या निर्णयानंतर सोशल मीडियावर राजकीय नेत्यांकडून टीका करण्यात येतं आहे. सीताराम येंचुरी, तेजस्वी यादव यांनी ट्विट करून या निर्णयाला विरोध केला आहे. सरकार याचा आपल्या धोरणांसाठी वापर करून घेत आहे, आपल्या मर्जीतील लोकांना या पदावर घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सीताराम येंचुरी यांनी ट्विट केले आहे.

Loading...

TRAILER :- सैराटचा रिमेक असलेल्या ‘धडक’चा ट्रेलर रिलीज

Previous article

जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत -भाजप खासदार

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *