Royal politicsटॉप पोस्ट

हरियाणातील या शाळेत शिकते फक्त एकच विद्यार्थीनी

0

तुम्हाला जर कोणी विचारले तुमचे शाळेमध्ये किती मित्र- मैत्रिणी होते, तर तुमचे उत्तर काय असले ? 10…20..30….कदाचित काहींचे उत्तर संपूर्ण वर्ग असे देखील असेल. पण हरियाणातील एका शाळेतील विद्यार्थीनीला एकही मित्र- मैत्रीण नाही.

कुसुम कुमारी, हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील एका मुलींच्या माध्यमिक सरकारी शाळेत सातवीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थी. तिचे या शाळेत एकही मित्र नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, शाळेत शिकते आणि तिचे शाळेत एकही मित्र – मैत्रीण नाही; पण हे खरे आहे. शाळेमध्ये तिचे एकही मित्र- मैत्रीण नाही. असणार तरी कसे ?

Loading...

टाईम्स आॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार,  ह्या शाळेमध्ये शिकणारी ती एकटीच विद्यार्थी आहे. तिच्याशिवाय तिथे एकही  मुलगी शाळेत शिकायला येत नाही. ती एकटीच या शाळेत शिकायला येते आणि या शाळेतील दया किशन नावाचे एकच शिक्षक तिला प्रत्येक विषय शिकवतात. ते या शाळेत शिकवणारे एकटेच शिक्षक आहेत. त्यांना महिन्याला 70 हजार पगार आहे.

कुसुम कुमारी म्हणते की, ‘मी एकटीच विद्यार्थी आहे याच मला काही वाटत नाही. फक्त एक गोष्ट मी मिस करते ती म्हणजे फ्रेंडस.’

वृत्तपत्रानुसार शैक्षणिक वर्ष 2014-15 मध्ये रेवाडीतील या सरकारी शाळेमध्ये 12 विद्यार्थी शिकत होते. 2016 मध्ये संख्या वाढत 22 वर गेली  पण सध्या तिथे एकच विद्यार्थी शिकत आहे. दया किशन सांगतात की, ‘राज्य शिक्षा विभाग या शाळेवर दर वर्षी साडे आठ लाख रुपये खर्च करते. परंतु इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र वाढतच नाही. दया किशन पुढे सांगतात की, माझे असे मत आहे की, या विद्यार्थीनीला शिकण्यासाठी जवळच्या दुसऱ्या शाळेत पाठवले पाहिजे.’

प्रश्न असा येतो की, तीन रूमची ही शाळा फक्त एका विद्यार्थीसाठी का चालवली जाते. यावर रेवाडी जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी सुरेश गोरिया यांचे म्हणणे आहे की, ‘लुखी गावातीय या शाळेतील परिस्थितीशी शिक्षण विभागाला पूर्णपणे माहिती आहे. या शाळेमध्ये सध्या फक्त एकच विद्यार्थी आहे. शिक्षण विभाग शाळेमध्ये प्रवेश देण्यास आणि शिकवण्यास नकार नाही देऊ शकत नाही. जर ती विद्यार्थी स्वतः दुसऱ्या कोणत्या शाळेत जाऊ इच्छित असेल तर अशा वेळेस शाळेविषयी काही विचार करण्यात येईल.’

Loading...

पाकिस्तान : निवडणूका संपेपर्यंत नवाज शरीफ यांचे घर ‘तुरूंग’च

Previous article

मोदी सरकारविरोधात लोकसभेत विरोधकांकडून अविश्वासदर्शक ठराव; शेतकरी प्रश्न सोडवण्यात अपयशी?

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *