Royal politicsटॉप पोस्ट

रत्नागिरीवासीयांचा विरोध झुगारून केंद्राकडून नाणार प्रकल्पाविषयी सामंजस्य करार

0

सौदी अरेबिया आणि भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या भागीदारीतून साकारण्यात येणाऱ्या तेल क्षेत्रातील अत्यंत महत्वकांशी मानल्या जाणाऱ्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाला सोमवारी मान्यता देण्यात आली.

रत्नागिरीतील स्थानिकांकडून कडाडून विरोध होणाऱ्या या प्रकल्पाबाबत बरेच राजकारण रंगले होते. शिवसेनेकडून, मनसेकडून देखील या प्रकल्पाला विरोध करण्यात आला. सततच्या होणाऱ्या या विरोधानंतर देखील केंद्र सरकारने हा प्रकल्प पुढे रेटला आहे.

Loading...

रत्नागिरी तेलशुद्धीकरण कंपनीबरोबर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत सौदी अरेबिया ची कंपनी अरम्को आणि अॅडनॉक या दोन कंपन्यांशी सोमवारी 25 जून ला आर्थिक सामंजस्य करार करण्यात आला आहे.

एप्रिल 2018 ला आयोजित 16 व्या आंतरराष्ट्रीय उर्जामंत्र्यांच्या परिषदेमध्ये भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांच्या संयुक्त गटाशी सौदी अरम्कोने सामंजस्य करार करून नाणार प्रकल्पात सहभाग घेतला होता.

भारत दौऱ्यावर असलेले संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद बिन सुलतान अल नह्यान आणि केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान हे काळ झालेल्या सामंजस्य करार वेळी उपस्थित होते.

यांच्या उपस्थितीत सौदी अरम्कोचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिन एच नासिर आणि अॅडनॉक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुलतान अहमद अल जबीर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

अशी असेल कंपन्यांमधील भागीदारी-

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपनी कडून स्थापन करण्यात आलेल्या रत्नागिरी तेल शुद्धीकरण कंपनीकडून 50% तर सौदी अरम्को आणि अॅडनॉक कंपनीकडून 50% अशी भागीदारी या नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी असेल. तर यासाठी लागणारे कच्चे तेल आणि तांत्रिक साहाय्य याचा पुरवठा सौदी कंपन्या करणार आहे.

एवढा खर्च येईल-

2022 मध्ये हा प्रकल्प उभा राहणार असून या प्रकल्प उभारणीचा अंदाजित खर्च 3 लाख कोटी असेल. या प्रकल्पातून दिवसाला 12 लाख बॅरल इतके तर वर्षाला 6 कोटी टन इतके तेल शुद्धीकरण होणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत बीएस 6 ही इंधन कार्यक्षमता असणारे पेट्रोल, डिझेल या पेट्रोलियम पदार्थांचे उत्पादन करण्यात येणार आहे.

Loading...

नीरव मोदी विरोधात काढण्यात आले अटक वॉरंट, खरंच होईल का अटक ?

Previous article

आवाज वाढव ‘डीजे’ वर आता कडक कारवाई; न्यायलयाने भरला पालिकांना दम

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *