टॉप पोस्टराजकारण

आंध्रप्रदेश सरकारचा निर्णय; राज्य ‘गांजामुक्त’ करण्याचा निर्धार

0

देशात मोठ्या प्रमाणात तरुण व्यसनांच्या अधीन होत असल्याचे दिसत असताना; आंध्रप्रदेश सरकारने राज्य गांजमुक्त करण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या कारणाने राज्याच्या अकबरी खात्याच्या अधिकार्‍यांनी पूर्व पश्चिम गोदावरी जिल्ह्यात 62 ठिकाणी छापे टाकत जवळपास 8 हजार किलो गांजा जप्त केला आहे.

जप्त करण्यात आलेली गांजाची पिके नारकोटिक ड्रग्स अॅण्ड सायकोट्रॉफिक सब्सस्टन्स अॅक्ट (एनडीपीएस) 1985 च्या नियमांनुसार नष्ट करण्यात आली आहेत.  एनडीपीएस 1985 कायद्यानुसार मादक आणि आमली पदार्थाची वाहतूक, व्यापार आणि वापर (उपभोग) हा गुन्हा आहे. 

Loading...

आंध्रप्रदेश राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री के. एस. जवाहर आणि उत्पादन आयुक्त  डॉ. पी. लक्ष्मी नरसिंहन यांच्या उपस्थितीत राज्यातील गांजाचे कोरडे पीक मोठ्या प्रमाणात जाळून टाकण्यात आले.

राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री के. एस. जवाहर पत्रकरांशी बोलताना म्हणाले की, ‘राज्यशासनाने ‘गांजामुक्त’ राज्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि शेतकर्‍यांना पिकाचे उत्पादन घेण्याबाबत चेतावणी देण्यात आली आहे.

पूर्व गोदावरी आणि विशाखापट्टणम  या जिल्ह्यांमधील  1.7 कोटी गांजाची पिके याआधी जाळून नष्ट करण्यात आली आहेत. विशाखापट्टणम जिल्ह्यांमध्ये काही भागात गांजा मोठ्या प्रमाणात पिकावण्यात येतो, याबाबत अधिकार्‍यांना संशय आहे की या भागात होणार्‍या गांजा लागवडीत माओवादी सहभागी आहेत आणि ते हा गांजा विकून आलेल्या पैशाचा वापर घातपात आणि कारवाया करण्यासाठी करतात.

आंध्रचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी 2014 मध्येच पोलिस अधिकार्‍यांना गांजा उत्पादनात सहभागी असल्याबद्दल कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

Loading...

बुद्धिबळपटू सौम्या स्वामिनाथन:- “मला बुरखा घालण्यास कोणीही सक्ती करू शकत नाही.”, इराण दौर्‍यातून माघार

Previous article

FIFA WC 2018 : या सहा टीमवर असेल सर्वांचेच लक्ष्य

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *