टॉप पोस्ट

गूगलवर ठोठावला 34 हजार 200 कोंटींचा दंड, अॅड्रॉइडचा केला गैरवापर

0

गूगलने युरोपीय कायदा असलेल्या अॅंटीट्रस्ट या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल 34 हजार 200 कोटी रुपयाचा दंड ठोठावला आहे. युरोपीय कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी युरोपमधील हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा दंड केला गेला आहे. गूगलने आपल्या अॅड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमच्या सर्वत्र असलेल्या दबदब्याचा गैरप्रकारे वापर केला आहे.

गठित करण्यात आलेल्या युरोपियन आयोगाच्या म्हणण्यानुसार गूगल आपल्या अॅड्रॉइड फोन बरोबर स्वतचे अॅप्स जोडत आहे. गूगल अॅड्रॉइडवर आधारित फोन बनवणार्‍या कंपन्यांना गूगलचे अॅड्रॉइड व्हर्जन बनवून ते फोनला जोडण्यास प्रतिबंध (आनिवार्य) केला आहे.

Loading...

अनेक मोठमोठ्या फोन कंपन्यांना आणि टेलिकॉम ऑपरेटर्सला पैसे पुरवून गूगल सर्च इंजिन किंवा अॅप्स मोबाइल फोनमध्ये सर्वात वर दाखवण्यास लावले आहेत.

काय आहे अॅंटीट्रस्ट कायदा-

या कायद्याला एकाधिकार विरोधात कायदा असे देखील म्हणले जाते. या कायद्यानवे कोणत्याही बलाढ्य कंपनीने आपल्या प्रभावाचा वापर करून बाजारातील इतर स्पर्धकांना बाजूला करण्याचा प्रयत्न करू नये. त्याने स्पर्धा नष्ट होते.

जर असे कोणत्याही कंपनीने केल्यास त्याच्यावर जबर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. या कारवाई अंतर्गत गूगलवर 34 हजार 200 कोटी रुपयाचा दंड ठोठावला आहे. आणि 90 दिवसात गूगलकडून करण्यात येणार्‍या सर्व बेकायदा गोष्टी थांबवण्यात येण्याचे आदेश दिले आहेत.

याचा अर्थ गूगलवर फोन निर्मात्या कंपन्यांना त्यांच्या मोबाइलमध्ये गूगल क्रोम आणि गूगल सर्च हे आधीपासून इंस्टॉल करून देण्यास आता निर्बंध/बंदी घालण्यात आली आहे.

गूगलने या देण्यात आलेल्या निर्णया संबंधात युरोपियन संघामध्ये दाद मागण्याचे ठरवले आहे. परंतु युरोपीय आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर गूगलला आपल्या सिस्टम मध्ये नक्कीच बदल करणे गरजेचे झाले आहे.

याआधी देखील गूगलकडून असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे आता गूगल वर नक्कीच कडक कारवाई होणार हे दिसत आहे. आणि आताच जीडीपीआर यामुळे युरोप मधील नियम कडक करण्यात आले आहे. इतर बलाढ्य कंपन्यांवर देखील अशी कारवाई या आधी करण्यात आली आहे.

मागील वर्षी देखील गूगल वर अशी कारवाई करण्यात आली होती, त्यावेळी गूगलवर €2.42 बिलियन एवढा दंड ठोठावण्यात आला होता. तर 2017 मध्येच फेसबुक वर €110 मिलियन एवढा दंड ठोठावण्यात आला होता. मिक्रोसॉफ्ट वर 2008 आणि 2013 मध्ये अनुक्रमे €899 मिलियन आणि €561 मिलियन एवढा दंड ठोठावण्यात आला होता.

Loading...

#खड्डयात_गेला_महाराष्ट्र ट्वीटरवर आहे ट्रेंडिंगमध्ये, जाणून घ्या का?

Previous article

घोटळा करून सरकारी नोकरी मिळवल्याप्रकरणी भाजप खासदाराच्या मुलीला अटक, जाणून घ्या नोकरी घोटाळा

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *