0

पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर एफसी रोडवरच्या रुपाली, वैशाली आणि कॅफे गुडलकचे चाहते असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत धक्कादायक आहे. कारण, पुण्यात अत्यंत लोकप्रिय असणारी ही हॉटेल्स अत्यंत अस्वच्छ असल्याचं अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पाहणीत आढळून आलंय.

अन्न आणि औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडींमध्ये पुण्यातल्या लोकप्रिय हॉटेल्सचा ढिसाळ आणि गलिच्छ कारभार समोर आलाय. या हॉटेलमधल्या किचनमध्ये कचऱ्याचं साम्राज्य आढळून आलं. तसंच, या हॉटेलमध्ये शिळे पदार्थ वापरले जात असल्याचंही समोर आलंय. प्रत्येक हॉटेलमध्ये स्वच्छतेसंदर्भात काही निकष एफडीएकडून घालून देण्यात आले आहेत. पुण्यातील लोकप्रिय हॉटेल्समध्ये या निकषांची पूर्तता होते का हे तपासण्यासाठी एफडीए अधिकाऱ्यांनी कॅफे गुडलक, वैशाली, रुपाली, याना सिझलर्स या हॉटेल्सवर धाडी टाकल्या.

Loading...

‘भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात गुरु शिष्याचं नातं’

Previous article

कोबीला भावच नाही ;शेतकऱ्याने फिरवला सात एकर शेतीवर नांगर

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *