मुख्य बातम्या

आनंदाची बातमी : कामानिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांसाठी मुंबईत विशेष एसटी बस सेवा सुरु !

0

मुंबई महानगर क्षेत्रात कामानिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांसाठी विशेष एसटी बसेस सुरु करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी याबाबतची माहिती दिली. येत्या सोमवारपासून पनवेल, डोंबिवली, विरार या ठिकाणाहून विशेष एसटी बसेस सुरु करण्यात येणार आहे, असेही अनिल परब यांनी सांगितले.

कोविड१९ च्या काळात रेल्वे व इतर सार्वजनिक वाहतूक बंद आहे. याकाळात महिलावर्गाला कोणतीही अडचण होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने येत्या सोमवारपासून शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार महिला विशेष फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. @CMOMaharashtra pic.twitter.com/QIpNV6w08n
— Anil Parab (@advanilparab) September 18, 2020

महिलांसाठी विशेष बससेवा सुरु करावी, अशी मागणी महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी 15 सप्टेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. या मागणीनंतर अवघ्या तीन दिवसात अनिल परब यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार मंत्रालय आणि इतर शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांना विशेष बससेवा सुरु केली जाणार आहे. महिलांची ने-आण करण्यासाठी एसटीने त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार पनवेल-मंत्रालय, डोंबिवली-मंत्रालय आणि विरार-मंत्रालय या मार्गावर महिला विशेष बस चालवल्या जाणार आहे. येत्या सोमवारी 21 सप्टेंबरपासून या बस फेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत. या फेऱ्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून अतिरिक्त फेऱ्या या मार्गावर वाढवण्यात येतील, असे एसटी प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या :-

मोदी सरकारचा मोठा निर्णय ; खासदारांच्या पगारात होणार ३० टक्के कपात !
अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय ! लोकलच्या १५० फेऱ्या वाढवल्या !!
पुण्यात मास्क न घालणाऱ्यांकडून वसूल केला तब्बल 25 लाख रुपयांचा दंड

मुंबईत येत्या काही आठवड्यांमध्ये भयंकर पसरेल कोरोना !
दारुप्रमाणे मंदिरातून महसूल मिळाला असता तर मंदिरं उघडली असती ; भाजपचा आरोप

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. आनंदाची बातमी : कामानिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांसाठी मुंबईत विशेष एसटी बस सेवा सुरु ! InShorts Marathi.

एसटीतल्या सर्व प्रवाशांची जबाबदारी अनिल परब घेणार आहेत का? मनसेचा थेट सवाल

Previous article

तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करुन त्यांना पुन्हा नागपुरात आणा ; शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Next article

You may also like

Comments

Comments are closed.