टॉप पोस्टमनोरंजन

Gold Trailer : देशभक्ती, वंदे मातरम्, ब्रिटिश राज, हाॅकी आणि बरचं काही

0

अक्षय कुमारची प्रमुख भुमिका असलेल्या गोल्डचा ट्रेलर आला आहे. या ट्रेलरमध्ये देशभक्ती, वंदे मातरम्, ब्रिटिश राज आणि हाॅकी अश्या अनेक गोष्टींचे एकत्रीकरण पाहायला मिळते.

‘गोल्ड’ हा हाॅकीवर आधारीत चित्रपट असून यामध्ये अक्षय कुमार बेंगाली हाॅकी कोचच्या भुमिकेत दिसणार आहे. या कोचचे स्वप्न ब्रिटिशांना त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करून गुलामीचा बदला घ्यायचा आहे.  1936 पासून ते 1948 चा कालावधी या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे.

Loading...

ब्रिटिश राजमध्ये गुलामीमध्ये खेळण्यात आलेली हाॅकी ते स्वतंत्र भारतासाठी पदक जिंकून आणण्याचे स्वप्न, असा प्रवास या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो.

“हमारे घर में इंकलाब जिंदाबाद पेहले होता है, फिर नाश्ता होता है” असे डायलाॅग देशभक्तीची भावना निर्माण करतात.  या चित्रपटात भारताने स्वातंत्र्यानंतर हाॅकीमध्ये पहिल्यांदाच जिकंलेल्या गोल्ड विषयीची गोष्ट सांगण्यात आली आहे. 1948 ला भारताने स्वतंत्र देशासाठी पहिले पदक जिंकले होते.

या चित्रपटात अक्षयकुमार बरोबर कुणाल कपूर, विनीत कुमार सिंग, अमित साध आणि सनी कौशल सुध्दा दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटातून ‘नागीण’ सिरीयलमधील मोनी राॅयदेखील बाॅलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

या चित्रपटाला रिमा कागतीने डायरेक्ट केले आहे. या आधी तिने आमीर खानचा ‘तलाश’चे डायरेक्शन केले आहे, तर ‘जिंदगी ना मिलेगी ना दोबारा’ व ‘दिल धडकने दो’ या सारख्या चित्रपटांचे पटकथा लेखन केले आहे.  रितेश सिंधवानी व फरहान अख्तर यांनी हा चित्रपटाचे प्रोडक्शन केले आहे.

हा चित्रपट येत्या 15 आॅगस्टला सर्वत्र रिलीज होणार आहे.

 

Loading...

140 वर्षात पहिल्यांदाच इंग्लंडने दिली आॅस्ट्रोलियाला 5-0 ने मात

Previous article

नीरव मोदी विरोधात काढण्यात आले अटक वॉरंट, खरंच होईल का अटक ?

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *