मुख्य बातम्या

कंगनाकडून पुन्हा एकदा घणाघात ; BMCची तुलना केली बाबर आणि पाकिस्तानशी

0

अभिनेत्री कंगना रनौत हिच्या मुंबईतील कार्यालयावर महापालिकेचा हातोडा पडला. पालिकेने सकाळी 11 वाजताच्या सुमारास ऑफिसचे टाळे तोडून कारवाईला सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर कंगनाने आधी आपल्या ऑफिसला राम मंदिराची उपमा देत बीएमसीची तुलना बाबराशी केली, नंतर तिने थेट पाकिस्तान असे लिहित लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात केला.

Babur and his army #deathofdemocracy pic.twitter.com/L5wiUoNqhl
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020

कंगनाने दिलेली उत्तरे आणि कारणे समाधानकारक नाहीत, असे सांगत मुंबई महापालिकेने तिचे वांद्र्याच्या पाली हिल परिसरात असलेले कार्यालय पाडणार असल्याचे स्पष्ट केले होते. पालिका अधिकाऱ्यांनी बुधवारी (9 सप्टेंबर) सकाळी 11 वाजताच्या सुमारास टाळे तोडून तिच्या कार्यालयात प्रवेश केला. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई सुरु करण्यात आली.

Pakistan…. #deathofdemocracy pic.twitter.com/4m2TyTcg95
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020

पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांचे फोटो शेअर करत कंगनाने ‘बाबर आणि त्याचे सैन्य’ असे लिहिले.नंतर कंगनाने थेट पाकिस्तान असे लिहित लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात केला. आधीच पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने कंगना अडचणीत आली असताना आता एक पाऊल पुढे जात तिने थेट ‘पाकिस्तान’ म्हटल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मोठी बातमी : शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते म्हणून सडेतोड उत्तर देणाऱ्या संजय राऊतांची नियुक्ती !
लवकरच शालेय शिक्षणात शेती विषयाचा समावेश करणार ; मोदीसरकारचा विचार सुरू
पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांचे पंचनामे करुन तातडीने मदत द्या ; फडणवीसांची सरकारकडे मागणी
शिरुरमधील धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कंगनाकडून पुन्हा एकदा घणाघात ; BMCची तुलना केली बाबर आणि पाकिस्तानशी InShorts Marathi.

धक्कादायक : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सुशांतच्या बहिणीवरही गुन्हा दाखल !

Previous article

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अशा होणार परीक्षा ; परीक्षेसाठीचा पॅटर्न जाहीर

Next article

You may also like

Comments

Comments are closed.