खेळटॉप पोस्ट

FIFA WC 2018 : मेक्सिकोचा धमाका, गतविजेत्या बलाढ्य जर्मनीचा केला पराभव

0

21 व्या फिफा वर्ल्ड कपमध्ये एफ ग्रुपमधील आजच्या मॅचमध्ये चार वेळा विजेत्या असेल्या बलाढ्य जर्मनीचा मेक्सिकोने 1-0 असा पराभव केला.  या वर्षी विजेतेपदाची दावेदार असलेल्या जर्मनीला आपल्या पहिल्याच मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. जर्मनीही 2014 च्या वर्ल्ड कपची विजेता आहे.

मॅचमध्ये एकमात्र गोल मेक्सिकोच्या हिरविंग लोजानोने केला. त्याने हर्नांडोच्या पासवर 35 व्या मिनिटा हा गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली.

Loading...

सुरूवातीचे 25 मिनिट दोन्ही संघाला एकही गोल करता आला नाही. 35 व्या मिनिटाला हिरविंग लोजानोने केलेल्या गोलवर मेक्सिकोने बढत मिळवली व ती बढत शेवटपर्यंत कायम ठेवली.

मध्यंतरानंतरही जर्मनीच्या खेळात आक्रमकपणा दिसुन नाही आला. शेवटच्या क्षणी जर्मनीने पुर्णजोर लावला पण त्याच्या खेळामध्ये आक्रमकपणा नव्हता. 77 व्या मिनिटाला मेक्सिकोच्या मिगुएल लायूनने गोल करण्याचा प्रयत्न केला पण त्याची किक गोलपोस्टच्या वरती गेली. जर्मनीला 8 वेळा कार्नरदेखील मिळाले पण ते त्याचा फायदा करू शकले नाही.

संपुर्ण मॅचमध्ये दोन्ही संघाला प्रत्येकी 2 येलो कार्ड मिळाले. तर संपुर्ण मॅचमध्ये जर्मनीचे  61%  बाॅलवर वर्चस्व होते तर 39 % बाॅलवर वर्चस्व होते.

 

Loading...

FIFA WC 2018 : सर्बियाने कोस्टा रिकावर केली 1-0 ने मात

Previous article

FIFA WC 2018 : 5 वेळाच्या वर्ल्ड कप विजेत्या ब्राजीलला स्विर्झलॅंडने बरोबरीत रोखले

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ