Royal politicsटॉप पोस्ट

महाराष्ट्रातून गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडणारी संशयित व्यक्ती अटकेत ?

0

कर्नाटक विशेष तपास पथकाने (एसटीआय)  जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणी महाराष्ट्रातून एक नवीन अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या 26 वर्षीय परशुराम वाघमारे या आरोपीला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

मागील वर्षी जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या बंगलोर येथील घराबाहेर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात येऊन आज्ञातांकडून त्यांची हत्या करण्यात आली होती. यावेळचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून हस्तगत करण्यात आले होते. या तपासानंतर ज्या व्यक्तीकडून गोळी झाडण्यात आली ती व्यक्ती आणि अटक केलेली व्यक्ती ही सारखी दिसत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Loading...

मार्च 2018 मध्ये हिंदू युवा सेनेचा कार्यकर्ता नवीन कुमार याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहिती नुसार 4 संशयितांची रेखाचित्रे पोलिसांकडून तयार करण्यात आली होती. त्यानुसार त्याच्या 4 सहकार्‍यांना गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणी,  आणि कन्नड लेखक के . एस. भगवान  यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी मागील आठवड्यात चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

कन्नड लेखक के . एस. भगवान  यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी  हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता अमोल काळे (पुणे) महाराष्ट्र, सनातन संस्थेचा कार्यकर्ता अमित देवगेकर, मनोहर यदावे (विजयपूर) कर्नाटक यांची अटक करणार्‍यांमध्ये नावे आहेत. यात सहभागी असलेल्या निहाल उर्फ दादा हा बेपत्ता आहे.  तर गोव्यातील उजव्या संघटनेचा पदाधिकारी नेता असलेला मोहन गौडा याचा पोलिस शोध घेत आहे.

आरोपी हिंदू युवा सेनेचा कार्यकर्ता नवीन कुमार याने आपण प्रवीण उर्फ सुजीतकुमार याच्या मदतीने गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली आहे.

 

Loading...

आरएसएसच्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांच्यावरील आरोप निश्चित

Previous article

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारास्वामी यांनी नाकारले नरेंद्र मोदी यांचे फिटनेस चॅलेंज

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *