मुख्य बातम्या

येत्या 1 ऑक्टोबरपासून ‘या’ बदललेल्या नियमांचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार !

0

येत्या 1 ऑक्टोबरपासून सरकार काही नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. बदललेल्या नियमांचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार आहे. ज्यामध्ये ड्राइव्हिंग लायसन्स, आरोग्य विमा, फॉरेनला पैसे पाठवण्यावरील टीसीएस आदी महत्त्वपूर्ण गोष्टींचा समावेश आहे.
GO Air ने 1 तारखेपासून टर्निनल बदलण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत तुम्ही जर GO Air च्या विमानाने प्रवास करणार असाल तर 1 तारखेपासून दिल्लीवरून जाणाऱ्या किंवा येणाऱ्या सर्व देशांतर्गत उड्डाणे दिल्ली विमानतळावरून टर्मिनल नंबर 2 वरून होणार आहे.

रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने मोटार वाहन नियम 1989 मध्ये केलेल्या सुधारणांविषयी नोटिफिकेशन काढलं आहे. ज्यामध्ये मोटार वाहन नियमांची अधिक चांगली देखरेख आणि अंमलबजावणी करण्यााठी 1 तारखेपासून पोर्टलद्वारे वाहनांची कागदपत्रे आणि ई चलन ठेवता येणार आहे. नव्या नियमांनुसार ड्राइव्हिंग लायसन्स काढायला आता जास्त कागदपत्रांची गरज पडणार नाही.
परदेशात पैसे पाठविण्यावर कर वसूल करण्याबाबत केंद्र सरकारने नवीन नियम बनवला आहे. परदेशात पैसे पाठवण्यावरील टीसीएसमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम नियम 1 तारखेपासून लागू होणार आहे.

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये नवे बदल होणार आहेत. यामध्ये कमी दरामध्ये अधिक आजार कव्हर केले जाणार आहेत. हे बदल आरोग्य विमा पॉलिसी प्रमाणित आणि ग्राहक केंद्रित करण्यासाठी केले जात आहेत. यात इतरही अनेक बदलांचा समावेश आहे.
बाजारामध्ये मिळणाऱ्या खुल्या मिठाईवरून सरकार सक्त पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. प्रस्तावित बदलेल्या नियमानुसार मिठाई दुकानदाराला मिठाई वापरण्याची अंतिम तारीख सांगावी लागेल. किती दिवस ती मिठाई खाण्यायोग्य असेल, याची माहिती दुकानदाराने ग्राहकाला द्यायला हवी. FSSAI ने खाद्यपदार्थांच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मोठी बातमी : विश्वास नांगरे पाटील यांची शरद पवारांसोबत बैठक ; भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या
राज्यातील रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा
Corona Update : राज्याचे मुख्य सचिव संजय कुमारांना कोरोनाची बाधा
राजकीय गोटात खळबळ ; शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजप-राष्ट्रवादी एकत्र?
चिंताजनक : देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख ७४ हजार ७०३वर
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. येत्या 1 ऑक्टोबरपासून ‘या’ बदललेल्या नियमांचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार ! InShorts Marathi.

शिवसेना येत नसल्यास राष्ट्रवादीने भाजपसोबत सरकार स्थापन करावं ; आठवलेंची धमाकेदार ऑफर

Previous article

मराठा आरक्षणासाठी मुंबईचे डबेवाले संभाजीराजेंच्या भेटीला,म्हणाले..

Next article

You may also like

Comments

Comments are closed.