खेळटॉप पोस्ट

FIFA WC 2018 : अर्जेटिना स्पर्धेतून बाहेर, फ्रांसचा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश

0

फिफा वर्ल्ड कपच्या नाॅकआउटच्या आजच्या पहिल्या मॅचमध्ये फ्रांसने अर्जेटिनाचा 4-3 असा पराभव केला. याच बरोबर फ्रांसने  क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही संघाना विजेतेपदाचे दावेदार मानले जात होते. पण नाॅकआउट राउंडमध्ये फ्रांसने अर्जेटिनाचा पराभव करत बाजी मारली.

फ्रांसच्या अॅन्टोनी ग्रेझमनने 13 व्या मिनिटाला पेनल्टी काॅर्नरवर पहिला गोल करत खाते उघडले. त्यानंतर पहिला हाफ संपायला काही मिनिटे बाकी असताना अर्जेटिनाच्या मारियाने 41 व्या मिनिटाला गोल करत बरोबरी केली.

Loading...

मध्यंतरानंतर फ्रांसने आक्रमक खेळ केला. मध्यंतरानंतर लगेचच अर्जेटिनाच्या मर्क्याडोने 48 व्या मिनिटाला गोल करत 2-1 अशी आघाडी घेतली. परंतू काही वेळातच फ्रांसच्या बेंझिमन पवार्डने 57 व्या मिनिटाला गोल करत 2-2 अशी बरोबरी ठरली.

सामना बरोबरी असताना फ्रांसच्या 19 वर्षीय कायलन एमबापेने कमालीचा खेळ केला. त्याने 64 व्या मिनिटाला गोल करत संघाला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर चारच मिनिटांनी कायलन एमबापेने आणखी एक गोल करत 4-2 ने संघाला आघाडी मिळवून दिली.

इंजुरी टाईममध्ये अर्जेटिनाने सामन्यात परतण्याचा शर्तीचा प्रयत्न केला. अग्युरोने गोल करत आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी फ्रांसने 4-3 ने अर्जटिनावर मात केली.

मागील वर्ल्ड कपमध्ये अर्जेटिना फायनल पर्यंत पोहचली होती. फायनलमध्ये त्यांना जर्मनीकडून पराभव स्विकारावा लागला होता.

अर्जेटिनाचा स्टार खेळाडू मेस्सी या मॅचमध्ये एकही गोल करू शकला नाही. त्याने या स्पर्धेत 4 मॅचमध्ये केवळ एकच गोल केला आहे. कदाचित हा त्याचा शेवटचा वर्ल्ड कप असू शकतो.

तसेच ही मॅच पाहायला तब्बल 42,873 प्रेक्षक उपस्थित होते.

Loading...

Hockey Champions Trophy 2018: भारताचा हाॅकी चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनलमध्ये प्रवेश, नेदरलॅंडविरूध्दचा सामना ड्राॅ

Previous article

रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाला हरवून उरुग्वेचा 2-1 असा रोमांचकारी विजय

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ