मुख्य बातम्या

इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी ; प्रकाश आंबेडकरांसह अनेकांना कार्यक्रमाचे निमंत्रणच नाही

0

महाविकासआघाडी सरकारकडून मुंबईच्या इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पादपीठ पुतळ्याच्या पायाभरणीचा सोहळा अचानकपणे जाहीर करण्यात आला आहे. आज दुपारी साडेतीन वाजता या सोहळा पार पडणार आहे. मात्र, राज्यातील विरोधी पक्षनेते आणि आंबेडकरी चळवळीशी संबंधित अनेक नेत्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रणच आले नसल्याची माहिती समोर आली आहे.
मुळात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची अनेकांना कल्पनाच नाही. यावरून मुख्यमंत्री कार्यालयातही सावळागोंधळ सुरु आहे. काहीवेळापूर्वीच आनंदराज आंबेडकर यांना कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाल्याचे समजते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील पुण्याचा दौरा घाईघाईने आटोपून मुंबईकडे रवाना झाले आहेत.
मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेकांना या कार्यक्रमाचे निमंत्रणच मिळालेले नाही. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरही केवळ महाविकासआघाडीतील नेत्यांची नावे दिसत आहेत. त्यामुळे आता यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :-

10 दिवसात मंदिर उघडली नाही तर पुन्हा पंढरपुरात येऊ ; आंबेडकरांचा सरकारला इशारा
फक्त रणबीर आणि रणवीरच कशाला आदित्य ठाकरेंचीही ड्रग्ज टेस्ट करा ? राणेंची खळबळजनक मागणी

काँग्रेस देशातील प्रमुख विरोधी पक्ष,जमिनीवरचे काम त्यांनी आता सुरू करायला हवे – संजय राऊत

आता मूक मोर्चे नाही संघर्ष अटळच ; नितेश राणेंचा ठाकरे सरकारला कडक इशारा
कंगना प्रकरणावरून शरद पवारांनी शिवसेनेचे कान टोचले? राऊतही नरमले

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी ; प्रकाश आंबेडकरांसह अनेकांना कार्यक्रमाचे निमंत्रणच नाही InShorts Marathi.

पूर्ण आसन क्षमतेने लालपरी रस्त्यावर धावणार ; प्रवाशांसाठी ‘हे’ नियम अनिवार्य

Previous article

बॉलिवूडने नाही तर मराठी चित्रपटसृष्टीने मला ‘वाळीत’ टाकले होते ; विक्रम गोखले यांचा गौप्यस्फोट

Next article

You may also like

Comments

Comments are closed.