Royal politicsमुख्य बातम्या

बांग्लादेशच्या माजी पहिल्या महिला पंतप्रधान झिया यांना 7 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

0

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा झिया यांना भ्रष्टाचार प्रकरणी 7 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. झिया चॅरिटेबल ट्रस्टमध्ये खलिदा झिया यांना 3 लाख 75 हजार डॉलरच्या  घोटाळ्याप्रकरणी ढाका विशेष न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले आहे.

या घोटाळ्याप्रकरणी खलिदा झिया यांच्याबरोबर न्यायालयाने आणखी 3 जणांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणी  झिया यांना 10 लाख रुपयांचा दंडही ठोठवण्यात आला असून दंड न भरल्यास 6 महिन्यांचा अधिक कारावास ठोठावण्यात येईल, असे देखील न्यायलयाने सुनावले आहे.

Loading...

न्यायालयीन कारवाईनंतर आता झिया यांना बांग्लादेशमधील सार्वत्रिक निवडणूक लढवता येणार नाही. न्यायालयाकडून शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर त्यांच्या पक्षाकडून ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे संगितले.

काय आहे घोटाळा – 

बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्ष असलेल्या खलिदा झिया यांनी आपल्या पंतप्रधान काळाच्या कारकिर्दीत कोट्यावधी रुपयांत आलेला अंतरराष्ट्रीय फंड आपल्या झिया चॅरिटेबल ट्रस्टमध्ये वळवला होता.

सन 2001 ते 2006 या काळात खलिदा झिया यांनी आपल्या झिया ट्रस्टसाठी कोट्यवधी रुपयांचा फंड जमा केला होता. या परदेशी फंडपैकी 3 लाख 75 हजार डॉलरचा घोटाळा केल्याचा ठपका झिया यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

बांग्लादेशच्या भ्रष्टाचार विरोधी आयोगाकडून 2011 मध्येच खलिदा झिया यांच्यावर खटला दाखल केला होता.

कोण आहे खलिदा झिया – 

  • त्या बांग्लादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत, त्या आता पर्यंत दोनदा बांग्लादेशच्या पंतप्रधान राहिल्या असून पहिल्यांदा 1991 ते 1996 आणि दुसर्‍यांदा 2001 ते 2006 पर्यंत या पंतप्रधानपदी होत्या.
  • त्या बांगलादेशचे राष्ट्रपती झिया उर रेहमान यांच्या पत्नी आहेत. झिया उर रहमान यांनी 70 च्या दशकात बांग्लादेश नॅशनल पार्टीची स्थापना केली होती.
  • आता त्या बांग्लादेश नॅशनल पार्टीच्या अध्यक्ष पदी आहेत.

घोटाळ्याप्रकरणी खटला रद्द करण्यात यावा यासाठी झिया यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होता, परंतू न्यायालयाने ही याचिका फेटाळत ढाका विशेष न्यायालयात खटला चालवण्याचे आदेश दिले होते.

Loading...

188 प्रवाशांना घेऊन जाणार्‍या अपघातग्रस्त विमानाचा पायलट ‘भारतीय’

Previous article

जाणून घ्या राममंदिर, शिवस्मारक, आरक्षण याबाबत काय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *