खेळटॉप पोस्ट

सोल्ड आउट! सुनील छेत्रीच्या भावनिक आवाहनानंतर चाहत्यांच्या तिकीट खरेदीवर उड्या

0

भारतीय फुटबाॅल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने आपल्या फुटबाॅल चाहत्यांना ट्वीटरवरून  भावनिक आवाहन करत संघाला सपोर्ट करण्यासाठी मैदानात सामना पहाण्यासाठी येण्याची विनंती केली होती. त्याच्या या आवाहनाला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.  ४ जून रोजी मुंबई येथे होणार्‍या भारत विरुद्ध केनिया च्या सामन्यासाठीची सर्व तिकिटे चाहत्यांच्या प्रतिसादामुळे विकली  गेली आहेत.

सुनील छेत्री आपल्या ट्विट मध्ये म्हणाला होता की,  “इंटरनेटवरून टीका करणे योग्य नाही, स्टेडियम मध्ये या; आमच्या समोर टीका करा. आमच्यावर ओरडा, किंचाळा  पण मैदानात सामना पाहण्यासाठी या.  काय माहित एक दिवशी आम्ही तुम्हाला बदलून टाकू व तुम्ही आमच्यासाठी चिअर करत असाल. तुमचे समर्थन आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे .”

Loading...

भारतीय फुटबाॅल  संघ चार देशांच्या इंटरकॉन्टिनेंटल कप 2018 स्पर्धेत खेळत आहे. आज केनिया विरुद्ध होणारा सामना सुनील  छेत्रीचा अंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील  100  रावा फुटबॉल सामना आहे.

सुनील छेत्री हा केवळ 2 रा भारतीय फुटबॉल खेळाडू आहे ज्याने 100 अंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. याआधी भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार भाइचुंग भूतिया याच्या नावे 104 अंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळण्याचा रेकॉर्ड आहे.

“मी स्वप्न पहिलं होत, पण मी 100 सामने खेळेल असा मला वाटला नव्हतं. हे माझ्यासाठी अविश्वसनीय आहे.” असे सुनील छेत्री म्हणाला.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत ट्वीटर वर विडियो शेअर केला आहे.

विराट या विडियो मध्ये सांगतो की, “मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही भारतीय फुटबॉल संघाचा सामना पाहाण्यासाठी नक्की  जा. तुम्हीला  कोणत्याही खेळ आवडत असेल तर तुम्ही मैदानात जा, संघाला  चिअर करा . कारण ते खूप मेहनत  घेतात, त्यांच्यात खूप क्षमता आहे. मागच्या अनेक सामान्यांपासून मी त्यांना पाहत आहे. ते त्यांचा खेळ खूप उत्कृष्ट खेळतात.”

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर छेत्रीला त्याच्या पुढील सामान्यसाठी शुभेच्छा देत ट्विट करतो की,

“हे खरे आहे की आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे, आपले खेळाडू त्यांच्या प्रशिक्षण काळात खूप मेहनत घेत असतात आणि आपल्या देशासाठी ट्रॉफी मिळवत असतात. आपण आपल्या खेळाडूंना सपोर्ट केला पाहिजे, कारण सपोर्ट आणि शुभेच्छा खेळाडूसाठी चांगले प्रोत्साहन देणारे ठरू शकते.” असे ट्विट करीत त्याने फुटबॉल संघाला शुभेच्छा दिल्या.

(PHOTO INPUT:- FACEBOOK/INDIANFOOTBALLTEAM)

Loading...

नितीश कुमार करणार बिहारमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचे नेतृत्व

Previous article

यूपीए-2 पेक्षा, मोदी सरकारच्या 4 वर्षाच्या कलावधीत झालेले बँकिंग घोटाळे 3 पट अधिक: आरबीआय

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ