Royal Entertainmentमुख्य बातम्या

“कारभारी… लयभारी’चे अकलूज परिसरात चित्रीकरण सुरू

0

अकलूज -सोलापूर जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अकलूज व आजूबाजूच्या परिसरात “झी-मराठी’च्या “कारभारी… लयभारी’ या मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले असून, पुढचे एक-दीड वर्ष चित्रीकरण सुरू असणार आहे. यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून स्थानिक कलाकार आणि व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
अकलूज हे सांस्कृतिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे. आनंदी गणेश, शिवसृष्टी किल्ला, अकलाई मंदिर, शिव-पिर्वती, सयाजीराजे वॉटर पार्क इत्यादी पर्यटनाचे ठिकाणे चित्रीकरणासाठी सोयीची आहेत, यामुळे अकलूज चित्रीकरणाच्या दृष्टीने कायम आकर्षणाचे ठिकाण आहे.
त्यामुळेच रोजगार निर्मितीचा विचार करून धैर्यशील मोहिते पाटील यांनी या मालिकेचे निर्माते तेजपाल वाघ यांना अकलूज आणि परिसरात चित्रीकरणासाठी विनंती केली आणि अकलूजला हे चित्रीकरण सुरू झाले. यामुळे अकलूज व परिसरातील शंभर ते दीडशे नवोदित कलाकारांना काम करण्याची संधी निर्मात्याने उपलब्ध करून दिली आहे.
चित्रीकरणाच्या सेटवर कामासाठी स्पॉट बॉय, जेवण पुरवण्यासाठी केटरर्स, कपडे पुरविणारे, लॉन्ड्री, वाहने, ट्रॉली, जनरेटर, लॉजिग, हॉटेल, केशभूषा आदींसह चित्रीकरणासाठी लागणारे साहित्य पुरवणारे, अशा शेकडो व्यावसायिकांना रोजगार मिळत आहे. लॉकडाऊननंतर विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्याची संधी या कारभारी लयभारीच्या माध्यमातून मिळाली आहे.
चित्रपट व मालिकेच्या चित्रीकरणाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची व्यावसायिक उलाढाल होत असते. स्थानिकांना रोजगार निर्माण होतो. नवोदित कलाकारांना संधी मिळत असते तर व्यापारी व्यावसायिकांचे अर्थच्रक फिरत असते कोरोनाच्या परिस्थिती मुळे मंदावलेले अर्थ चक्राला गती देण्यासाठी अकलूजला चित्रीकरण सुरू करावे म्हणून विनंती केली आणि या मालिकेचे निर्माते तेजपाल वाघ यांनी चित्रीकरण सुरू आहे.
– धैर्यशील मोहिते पाटील, अकलूज
The post “कारभारी… लयभारी’चे अकलूज परिसरात चित्रीकरण सुरू appeared first on Dainik Prabhat.

मौनी रॉयचे ग्लॅमरस फोटोशूट

Previous article

शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर करू नका ही 5 कामे, मानले जाते अशुभ!!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.