खेळटॉप पोस्ट

FIFA WC 2018 : यजमान रशियाची धमाकेदार सुरूवात, सौदी अरेबियावर केली 5-0 ने मात

0

मॉस्को (रशिया) :-

रशिया येथे सुरू असलेल्या 21 व्या फिफा वर्ल्ड कपच्या कालच्या(गुरूवार) मॅचमध्ये यजमान रशियाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत सौदी अरबियाचा 5-0 असा पराभव करत स्पर्धेची धमाकेदार सुरूवात केली. या विजयाबरोबरच वर्ल्ड कपमध्ये यजमान संघाची कधीही पराभूत न होण्याची परपंरा कायम ठेवली.

Loading...

सामना सुरू होताच रशियाने आक्रमक खेळ करत सौदी अरबियावर दबाव बनवण्यास सुरूवात केली. 13 व्या मिनिटालाच युरी गांझिस्कीने हेडर मारत गोलकिपरला चकवले व रशियासाठी पहिला गोल केला. हा गोल युरी गांझिस्कीचा पहिला आंतरराष्ट्रीय गोल ठरला.

सौदी अरबियाला फ्री किक मिळाली पण त्याना त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. 43 व्या मिनिटाला डेनिस चेरीशेवने आणखी एक गोल करत रशियाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. तो गोल करण्याच्या काही सेंकदापुर्वीच मैदानात आला होता. त्याने मैदानात आल्यानंतर फक्त 89 सेंकदात गोल केला.  2002 नंतर राखीव खेळाडूने केलेला हा सर्वात जलद गोल ठरला आहे.

मध्यंतरापुर्वी रशियाकडे 2-0 अशी आघाडी होती. ती त्यांनी मध्यंतरानंतर देखील कायम ठेवत सौदी अरबियाला सामन्यात परतण्याची एकही संधी दिली नाही.

71 व्या मिनिटाला अरटेम डेज्युबाने गोल करत रशियाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सामना संपायला काही मिनिटांचाच खेळ बाकी असताना 91 व्या मिनिटाला डेनिस चेरीशेवने आणखी एक गोल केला. त्याच्या पुढच्याच मिनिटाला अॅलेक्सॅंडर गोलोविनने आणखी एक गोल करत टीमला 5-0 असा विजय मिळवून दिला.

(PHOTO INPUT- FACEBOOK/FIFAWORLDCUP)

Loading...

मद्रास उच्च न्यायालयाचे तमिळनाडूतील आमदारांच्या अपात्रतेबाबत एकमत नाही

Previous article

कोण होते शुजात बुखारी? ज्यांची काश्मीरमध्ये हत्या करण्यात आली

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ