खेळटॉप पोस्ट

FIFA WC 2018 : 5 वेळाच्या वर्ल्ड कप विजेत्या ब्राजीलला स्विर्झलॅंडने बरोबरीत रोखले

0

21 व्या फिफा वर्ल्ड कपमध्ये ई ग्रुपमधील कालच्या मॅचमध्ये बलाढ्य ब्राजीलला स्विर्झलॅंडने 1-1 असे बरोबरीत रोखत सामना ड्राॅ केला. 1978 नंतर पहिल्यादांच असे झाले आहे की, ब्राजील वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना जिंकू शकली नाहीये. ब्राजील ही सर्वाधिक 5 वेळा वर्ल्ड कप जिंकणारी टीम आहे. त्यामुळे ब्राजीलला बरोबरीत रोखून स्विर्झलॅंडने प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच दिला.

ब्राजीलने सुरूवातीला पहिल्या हाफमध्ये आक्रमक खेळ केला. 20 व्या मिनिटालाच फिलीप कोतिन्होने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली व ती आघाडी ब्राजीलने मध्यंतरापर्यंत तशीच कायम ठेवली.

Loading...

मध्यंतरानंतर 5 मिनिटांनीच पेनल्टी काॅर्नरवर स्टिव्हन जुबेरने गोल करत स्विर्झलॅंडला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. त्यांनतर दोन्ही संघाकडून गोल करण्याचे अनेक प्रयत्न झाले; पण त्यांना गोल करण्यात अपयश आले.

विजेती पदाची दावेदार असलेल्या ब्राजीलला त्यांचा स्टार खेळाडू नेमारकडून भरपूर अपेक्षा होत्या. त्याने सुरूवातीला चांगला खेळ केला; पण त्याचे रूपातंर तो गोलमध्ये करू शकला नाही. सामन्याच्या शेवटी नेमारला फ्री किक मिळाली होती पण तो गोल करू न शकल्याने मॅच ड्राॅ झाली.

ग्रुप आॅफ डेथ असणाऱ्या या ग्रुपमध्ये सर्बिया कोस्टा रिकाला हरवत प्रथम स्थानावर आहे. त्यामुळे पुढे जाण्यासाठी ब्राजीलला पुढील सर्व मॅच जिंकणे गरजेचे आहे.

(PHOTO INPUT :- FACEBOOK/FIFAWORLDCUP)

Loading...

FIFA WC 2018 : मेक्सिकोचा धमाका, गतविजेत्या बलाढ्य जर्मनीचा केला पराभव

Previous article

OPINION : हू किल्ड द प्रेस ?

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ