खेळटॉप पोस्ट

FIFA WC 2018 : अखेर मेस्सीच्या अर्जेंटिनाचा अंतिम-16 मध्ये प्रवेश

0

फिफा वर्ल्ड कपच्या काल झालेल्या मॅचमध्ये अर्जेटिनाने नायजेरियाचा पराभव करत अंतिम-16 मधील आपले स्थान पक्के केले. मार्कोस रोजोने शेवटची चार मिनिटे बाकी असताना केलेल्या गोलने अर्जेटिनाला अंतिम -16 मध्ये प्रवेश मिळवून दिला.अर्जेटिनाने नायजेरियाचा 2-1 असा पराभव केला. आता अंतिम -16 मध्ये त्यांची लढत फ्रांसशी होणार आहे.

अर्जेटिना अंतिम-16 मध्ये पोहचण्यासाठी क्रोएशिया आणि आईसलॅंड यांच्या मॅचवर अवलंबून होते. क्रोएशियाने आईसलॅंडचा पराभव करताच अर्जेटिनाचे स्थान पक्के झाले.

Loading...

सामना सुरू झाल्यापासून अर्जेटिनाने आक्रमक खेळ केला. 14 व्या मिनिटालाच बानेगाच्या पासिंगवर मेस्सीने शानदार गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मेस्सीचा हा या वर्ल्ड कपमधील पहिलाच गोल ठरला.  पहिल्या हाफमध्ये नायजेरियाला गोल करण्याची अनेक संधी आली; पण त्यांना गोल करता आला नाही.

 

मध्यंतरानंतर  नायजेरियाचा संघ आक्रमक दिसत होता. 51 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर विक्टर मोसेसने गोल  करत स्कोर बरोबर केला.

शेवटच्या चार मिनिटापर्यंत अर्जेटिना नाॅकआउटमध्ये प्रवेश करणार की नाही ते नक्की नव्हते. अर्जेटिनाला विजयासाठी गोलची गरज होती, जरी मॅच ड्राॅ झाली असती, तरीही अर्जेटिना बाहेर पडली असती, त्यामुळे त्यांना विजय गरजेचा होता. अखेर 86 व्या मिनिटाला मार्कोस रोजोने गोल करत संघाला 2-1 अशी आघाडी घेतली व ती आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवली.

दुसरी  क्रोएशिया विरूध्द आईसलॅंडची मॅच देखील बरोबरीत चालली होती. त्या सामन्यात क्रोएशियाने आघाडी घेताच अर्जेटिनाच्या चाहत्यांच्या जल्लोषाने स्टेडिअमच हादरून सोडले.

अंतिम -16 अर्जेटिंनाची लढत फ्रांसशी होणार असून क्रोएशियाचा सामना डेनमार्कशी होणार आहे.

 

Loading...

‘देशातील अघोषित आणीबाणी; आणीबाणी पेक्षा अधिक भयंकर’; राजस्थानमध्ये राजकीय गोंधळ

Previous article

आवाज वाढव ‘डीजे’ वर आता कडक कारवाई; न्यायलयाने भरला पालिकांना दम

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ