खेळटॉप पोस्ट

FIFA WC 2018 : या सहा टीमवर असेल सर्वांचेच लक्ष्य

0

फुटबाॅल जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक खेळ आहे.  जगभरातील करोडो चाहते अक्षरशः टिव्ही समोर डोळे लावून हा खेळ पाहत असतात. फिफा वर्ल्ड कपची तर बातच काही और असते. दर चार वर्षाने होणारा वर्ल्ड कप पाहण्यासाठी करोडो चाहते जमा होत असतात. आता त्याच फिफा वर्ल्ड कपच्या 21 व्या पर्वाला लवकरच सुरूवात होणार आहे.

या वर्षीचा फिफा वर्ल्ड कप हा रशियातील 11 शहरात खेळला जाणार असून, हे फिफा वर्ल्ड कपचे 88 वे वर्ष आहे. 14 जून ते 15 जुलै या दरम्यान हा वर्ल्ड कप खेळला जाणार अाहे.

Loading...

1930 पासून फिफा वर्ल्ड कपचे आयोजन केले जात असून, पहिला फिफा वर्ल्ड कप हा उरूग्वे या देशात खेळला गेला होता व पहिल्या फिफा वर्ल्ड कपचा विजेता देखील यजमान संघ उरूग्वे हाच होता.

हे ही वाचा –  फिफा वर्ल्ड कपविषयी जाणून घ्या 15 मजेशीर फॅक्ट

आज पर्यंत झालेल्या वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त वेळा युरोपियन खंडातील देशांनी 11 वेळा तर साउथ अमेरिका खंडातील देशांनी 9 वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. साउथ अमेरिका खंडातील ब्राजील देशाने सर्वात जास्त 5 वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे.  बाहेरच्या खंडातील एकाही देशाला आजपर्यंत एकदाही वर्ल्ड कप जिकंता आलेला नाही.

या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये 32 टीम क्वाॅलिफाय झाल्या असुन क्वाॅलिफाय सामन्यात 210 टीमनी भाग घेतला होता. 32  टीमची 8 गटात विभागणी करण्यात आली असुन प्रत्येक गटात 4 टीम आहेत.

सहा टीमवर असेल सर्वांचेच लक्ष्य – 

1) जर्मनी

जर्मनीने या आधी 1954,1974,1990 आणि 2014 अशा एकूण 4 वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकला आहे. मागील  वर्ल्ड कपचा देखील विजेता असलेल्या या टीमकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. क्वाॅलिफायिंग मॅचमध्ये जर्मनी 10 पैकी 10 मॅच जिकंत स्वताला सिद्ध केले आहे.

ब्राजील व अर्जेटिनापेक्षा जर्मनीच्या टीमकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जोकिम लाॅ कोच असलेल्या या संघाकडे अनेक चांगले खेळाडू आहेत. त्यांच्याकडे महत्वाचा स्ट्रायकर नसला तरीही अनेक चांगले खेळाडू संघाला विजय मिळवून देऊ शकतात.

लगातर दोन वेळेस वर्ल्ड कप जिंकण्याचा रेकाॅर्ड फक्त ब्राजीलच्या नावावर आहे. त्यांनी 1958, 1962 ला वल्ड कप जिंकला होता. त्यामुळे 2014 चे विजेते असलेल्या जर्मनीच्या टीमला देखील या वर्षीचा वर्ल्ड कप जिंकून रेकाॅर्ड कायम करण्याची संधी आहे.

2) ब्राजील

ब्राजीलच्या टीमने आजपर्यंत सगळ्यात जास्त वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यांनी 1958,1962,1970,1994 आणि 2002 ला वर्ल्ड कप जिंकला आहे.  साउथ अमेरिकन क्वाॅलिफायरमध्ये सहाव्या स्थानावर आल्यानंतर त्यांनी त्यांचा कोच दुंगा याला काढून त्याच्या जागी टाइटची नेमणूक करण्यात आली होती. टाइटच्या नेमणुकीनंतर ब्राजीलची टीम एकदाही पराभुत झाली नाही.

तसेच स्टार खेळाडू नेमार मुळे ब्राजीलच्या टीमचे पारडे जड आहे.

3) फ्रांस

1998 चा वर्ल्ड कप विजेता संघ फ्रांसला या स्पर्धेत क्वाॅलिफाय करण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. क्वालिफायिंग मॅचमध्ये त्यांना स्विडनकडून पराभव स्विकारावा लागला, तर घरच्या मैदानावर झालेली लुक्झेंबर्ग यांच्या बरोबरची मॅच देखील ड्राॅ झाली होती.

फांस हा विजेते पदाचा दावेदार ठरू शकतो. पण त्यांचा संघ फक्त कागदावरच चांगला वाटतो. मैदानावर त्यांच्याकडून नावाप्रमाणे खेळ होताना दिसुन येत नाही. संघातील खेळाडू पाॅल पाॅग्बा व किलियन मबाप्पे हे खेळाडू स्वाताला ग्लोबल स्टार म्हणून सिद्ध करू शकतात.

फ्रांस वल्ड कप जिंकू शकतो पण त्यांचा कोच डिडर डेसचॅंम्स यांच्या कतृत्वावर प्रश्न चिन्ह आहे.

4)अर्जेंटिना

मेस्सीचे असणे ही एकच गोष्ट अर्जेंटिनाला विजयापर्यंत पोहचवू शकते. मेस्सीमुळेच अर्जेटिना विजेते पदाचा दावा ठोकू शकते. असे असले तरीही अर्जेटिनाला जर्मनी, स्पेन आणि ब्राजील संघाचे कडवे आव्हान असणार आहे.

अर्जेटिनाच्या टीमने 1978 व 1986 साली वर्ल्ड कपवर नाव कोरले आहे. या टीमकडे उत्तम डिफेंस व उत्तम अटॅक देखील आहे. कोच जाॅर्ज सॅमपोली आपल्या संघाला वेगळ्या रूपात दाखवून नक्कीच विजेतेपदावर दावा करू शकतो.

5) स्पेन

क्वाॅलिफायिंग मॅचमध्ये स्पेनने इटलीचा 3-0 असा पराभव करत वर्ल्ड कपमधील आपली दावेदारी निश्चित केली आहे.  स्पेनची टीम 2010 मध्ये विजेती ठरली होती.  त्यामुळे 2008 ते 2012 प्रमाणे स्पेन स्वताला सर्वोत्तम टीममध्ये रुपातंर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.

तसेच टीममधील जुने खेळाडू जेरार्ड पिक, सेर्जिओ रामोस आणि सेर्जिओ बस्क्युट्स या खेळाडूंवर मदार असली तरीही इस्को, मार्को अॅसेन्सिओ व सोल निगुयेझ यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे. अॅन्डरेस इनिइस्टा चा कदाचित हा शेवटचा वर्ल्ड कप ठरू शकतो. त्यामुळे स्पेन त्याला चांगला निरोप देण्यासाठी तरी सर्वोत्तम खेळ करेल हे निश्चित.

6)बेलजियम –

2018 च्या वर्ल्ड कपमध्ये बेलजियमची टीम अंडरडाॅग टीम आहे. 1986ला बेलजियमची टीम सेमीफायनल पर्यंत पोहचली होती. ह्या वर्ल्ड कपमध्ये क्वाॅलिफाय करणारी बेलजियम ही पहिली टीम होती.

कागदावर तरी बेलजियमची टीम परिपुर्ण दिसते. त्यांच्याकडे चांगला डिंफेस, योग्य मिड फिल्ड तसेच इडन हजार्ड आणि ड्राईस मर्टेंस सारखे उत्तम स्ट्रायकर देखील आहेत.

2014 ला ही टीम क्वाटर फायनलला पोहचली होती. त्यामुळे या वेळेस जर ही टीम पुढे गेली नाही तर नक्कीच वाईट गोष्ट असेल.

 

READ THIS NEWS IN ENGLISH –

FIFA WC 2018 : Here are the 6 teams to look out for

 

Loading...

आंध्रप्रदेश सरकारचा निर्णय; राज्य ‘गांजामुक्त’ करण्याचा निर्धार

Previous article

शाहरूखचा चाहत्यांना ईद का तोफा, झिरोचा टीझर रिलीज

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ