खेळटॉप पोस्ट

FIFA WC 2018 : सर्बियाने कोस्टा रिकावर केली 1-0 ने मात

0

21 व्या फिफा वर्ल्ड कपमध्ये ई ग्रुपमधील आजच्या मॅचमध्ये सर्बियाने कोस्टा रिकाचा 1-0 असा पराभव करत स्पर्धेतील आपला पहिला सामना जिंकला. दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेंकांविरूध्द लढत होते.

सर्बियाकडून अलेक्सेंडर कोलरावने 56 व्या मिनिटाला गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. सर्बियाने ती आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत कोस्टा रिकाला सामन्यात परतण्याची एकही संधी दिली नाही.

Loading...

मध्यंतरापुर्वी दोन्ही संघाला गोल करण्याची अनेक संधी अाला पण त्यांना गोल करता आला नाही. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 0-0 असे बरोबरीत होते.  कोस्टा रिकाने सर्बियाच्या गोल पोस्टवर अनेकवेळा आक्रमण केले पण त्यांना गोल करता आला नाही.

या संपुर्ण सामन्यात कोस्टा रिकाला 2 तर सर्बियाला 2 येलो कार्ड मिळाले. तसेच संपुर्ण सामन्यात कोस्टा रिकाचे 53 % बाॅलवर वर्चस्व होते तर सर्बियाचे 47% वर्चस्व होते.

Loading...

FIFA WC 2018 : 36 वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या पेरूचा पराभव, पाॅलसनच्या गोलच्या मदतीने डेनमार्कचा विजय

Previous article

FIFA WC 2018 : मेक्सिकोचा धमाका, गतविजेत्या बलाढ्य जर्मनीचा केला पराभव

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ