खेळटॉप पोस्ट

FIFA WC 2018 : कोलंबियाची पोलंडवर 3-0 ने मात, तर जापान-सेनेगल मॅच ड्राॅ

0

21 व्या फिफा वर्ल्ड कपमध्ये एच ग्रुपमधील कालच्या मॅचमध्ये कोलंबियाने पोलंडचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला.

कोलंबियातर्फे येरी मिना याने 40 व्या मिनिटला गोल करत खाते उघडले. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये कोलंबियातर्फे रदामेल फालकोने 70 व्या मिनिटाला आणि जुआनने 75 व्या मिनिटाला गोल करत संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली.

Loading...

पोलंडने मॅचमध्ये एकही गोल केला नाही. त्यांना 0-3 ने पराभव स्विकारावा लागला.

कोलंबियाचा हा वर्ल्ड कपमधील पहिलाच विजय असून, पोलंड स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

जापान-सेनेगल मॅच –

कालच्या एच ग्रुपमधील दुसऱ्या मॅचमध्ये जापान आणि सेनेगल यांच्यामधील मॅच 2-2 अशी बरोबरीत राहिली.

सेनेगलतर्फे सादियो मेनने 11 व्या मिनिटाला गोल करत खाते उघडले. त्यानंतर जापानच्या तकाशी इनुईने ३४ व्या मिनिटाला गोल करत जपानला बरोबरी साधून दिली.

मध्यतंरानंतर जपानने आक्रमक खेळ केला. सेनेगलच्या मोसा वाग्यूने 71 व्या मिनिटाला गोल करत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. सेनेगलने ही आघाडी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला ; पण केईसुके होंडाने 78व्या मिनिटाला गोल करत मॅचमध्ये 2-2 अशी बरोबरी केली. त्यानंतर दोन्ही संघाना गोल करता आला नाही व मॅच 2-2 अशी ड्राॅ राहिली.

 

Loading...

FIFA WC 2018 : इंग्लंडची पनामावर 6-1 ने मात, हॅरी केनची हॅट्रिक, इंग्लंड अंतिम-16 मध्ये

Previous article

140 वर्षात पहिल्यांदाच इंग्लंडने दिली आॅस्ट्रोलियाला 5-0 ने मात

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ