खेळटॉप पोस्ट

FIFA WC 2018 : रशिया-क्रोएशियाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, पेनल्टी शुटआउटमध्ये दोन्ही संघाचा विजय

0

फिफा वर्ल्ड कपच्या नाॅकआउट मॅचमध्ये यजमान रशियाने पेनल्टी शुटआउटमध्ये स्पेनचा1-1(4-3) असा, तर दुसऱ्या मॅचमध्ये क्रोएशियाने पेनल्टी शुटआउटमध्ये डेनमार्कचा 1-1(3-2) असा पराभव केला. दोन्ही मॅच अगदी रोमांचकारी झाल्या. या विजयाबरोबरच दोन्ही संघानी फिफा वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश आहे.

दोन्ही मॅचचे हिरो हे त्यांचे गोल किपर ठरले. आता उपांत्यपूर्व फेरीत रशिया आणि क्रोएशिया यांच्यामध्ये लढत होणार आहे.

Loading...

रशिया विरूध्द स्पेन मॅच

पहिल्या मॅचमध्ये यजमान रशियाने शानदार खेळ केला. पहिल्या हाफमध्ये रशियाच्या सेर्जाई इग्नाशेवीजने १२ मिनिटाला केलेल्या स्वयंगोलने स्पेनला १-० अशी आघाडी मिळाली. त्यानंतर पहिला हाफ संपायला काही मिनिटे बाकी असताना 41 व्या मिनिटाला रशियाच्या डज्युबाने  गोल करत 1-1 अशी आघाडी साधली.  पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी गोल करुन १-१ ने बरोबरी राखली होती.

दुसऱ्या हाफमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही. त्यानंतर दिले गेलेल्या अतिरिक्त वेळेत देखील एकाही संघाला गोल करता आला नाही. त्यानंतर पेनल्टी शुटआउटमध्ये यजमान रशियाने विजेते पदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या स्पेनचा 4-3 असा पराभव केला.

क्रोएशिया विरूध्द डेनमार्क मॅच

क्रोएशियाविरूध्द डेनमार्क मॅचमध्ये क्रोएशियाने डेनमार्कचा पेनल्टी शुटआउटमध्ये 1-1(3-2) असा पराभव केला. या विजयाबरोबरच क्रोएशियाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. क्रोएशिया या स्पर्धेत अपराजित आहे.

मॅच सुरू होताच पहिल्याच मिनिटाला डेनमार्कच्या जाॅर्जसेनने गोल करत 1-0 अशी आघाडी घेतली त्यानंतर लगेचच क्रोएशियाने 4 थ्या मिनिटाला गोल करत 1-1 अशी बरोबरी साधली त्यानंतर मात्र पुर्ण वेळेत एकाही संघाला गोल करता आला नाही. त्यामुळे मॅच पेनल्टी शुटआउटमध्ये गेली.

पेनल्टी शुटआउटमध्ये क्रोएशियाने डेनमार्कचा 3-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाची लढत यजमान रशियाशी होणार आहे.

 

 

Loading...

Hockey Champions Trophy 2018: पुन्हा 2016 ची पुर्नावृत्ती, भारतावर मात करत आॅस्ट्रोलियाने 15व्यांदा कोरले चॅम्पियन्स ट्रॅाफीवर नाव

Previous article

द वाॅल – राहुल द्रविडचा आयसीसी ‘हाॅल आॅफ फेम’मध्ये समावेश

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ