खेळटॉप पोस्ट

FIFA WC 2018 : बेल्जियमने ट्युनिशियाचा उडवला धुव्वा

0

21 व्या फिफा वर्ल्ड कपमध्ये जी ग्रुपमधील आजच्या मॅचमध्ये बेल्जियमने आपल्या दुसऱ्या मॅचमध्ये ट्युनिशियाचा 5-2 असा पराभव केला.

या सामन्यात पहिल्या हाफ पासुन बेल्जियमचे वर्चस्व होते. 6 व्या मिनिटालाच बेलजियमच्या ईडन हजार्डने पेनल्टीवर पहिला गोल करत संघाला शानदार सुरूवात मिळवून दिली. यांनतर 16 व्या मिनिटाला रोमेलू लुकाकूने गोल करत संघाला 2-0 ने आघाडी मिळवून दिली.

Loading...

19 व्या मिनिटाला ट्युनिशियाच्या डायलन ब्राॅनने गोल केला. त्यानंतर पहिल्या हाफच्या एकस्ट्रा टाईममध्ये रोमेलू लुकाकूने आणखी एक गोल करत संघाला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली व याच बरोबर रोमेलू लुकाकूने या वर्ल्ड कपमध्ये रोनाल्डोच्या सर्वाधिक चार गोलशी बरोबरी केली.

मध्यंतरानंतर ट्युनिशिया कमबॅक करेल असे वाटत होते पण बेल्जियमने आक्रमक खेळ सुरूच ठेवला. 51 व्या मिनिटाला ईडन हजार्डने आणखी एक गोल केला व बेल्जियमने मॅचमध्ये 4-1 ने आघाडी घेतली.

सामना संपायला एकच मिनिट बाकी असताना मिची बेतशुआईने आणखी एक गोल केला. त्यांनतर ट्युनिशियाच्या व्हाबी खाझरीने इंजुरी टाईममध्ये गोल केला व याचबरोबर ट्युनिशियाला या मॅचमध्ये 5-2 ने पराभव स्विकारावा लागला.

जी ग्रुपमध्ये बेल्जियम दोन्ही मॅच जिंकून प्रथम स्थानावर आहे तर ट्युनिशिया दोन्ही मॅच हरल्याने बाहेर पडण्याची शक्यता आहे.

(PHOTO INPUT :- FACEBOOK/FIFAWORLDCUP)

Loading...

Hockey Champions Trophy 2018: भारताने पाकिस्तानला 4-0 ने दिली मात

Previous article

महाराष्ट्र स्वच्छतेत देशात अव्वल परंतू पिंपरी-चिंचवड स्वच्छतेबाबत निष्कामी

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ