मुख्य बातम्या

वडिलांमुळे संपत्ती मिळू शकते पण सन्मान तुम्हालाच कमवावा लागतो ; कंगनाची मुख्यमंत्री ठाकरेंवर घणाघाती टीका

0

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि ड्रग्स रॅकेटवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यामध्ये वाद सुरू आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी कार्यालयावर तोडक कारवाई केल्याने संतप्त झालेल्या अभिनेत्री कंगना रनौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली.
“उद्धव ठाकरे तुला काय वाटतं? तुम्ही फिल्म माफियासोबत माझं घरं तोडून फार मोठा सूड उगवलात. आज माझं घर मोडलं आहे, उद्या तुझा अहंकार मोडेल.” अशी एकेरी भाषा कंगनाने वापरली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत संबोधत आव्हान देऊन अवघे काही तास उलटले नाहीत, तोच कंगनाने पुन्हा शरसंधान साधले आहे.

तुम्हारे पिताजी के अच्छे कर्म तुम्हें दौलत तो दे सकते हैं मगर सम्मान तुम्हें खुद कमाना पड़ता है, मेरा मुँह बंद करोगे मगर मेरी आवाज़ मेरे बाद सौ फिर लाखों में गूंजेगी, कितने मुँह बंद करोगे? कितनी आवाज़ें दबाओगे? कब तक सच्चाई से भागोगे तुम कुछ नहीं हों सिर्फ़ वंशवाद का एक नमूना हो।
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 10, 2020

‘तुमच्या वडिलांची चांगली कामे तुम्हाला संपत्ती देऊ शकतात, पण सन्मान तुम्हालाच कमवावा लागतो, तुम्ही माझे तोंड बंद कराल, पण माझा आवाज माझ्या नंतर शंभर कोटींमध्ये प्रतिध्वनी होईल, तुम्ही किती तोंड बंद कराल? आपण किती आवाज दाबाल? जोपर्यंत आपण सत्यापासून पळाल तोपर्यंत आपण राजवंशाच्या नमुण्याशिवाय काही नाही’ असे म्हणत कंगना रनौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली.

महत्वाच्या बातम्या :-
मोदींना जाब विचारण्याची हिंमत आहे का? मुख्यमंत्र्यांचा भाजपला खडा सवाल
कोरोना काळात आंदोलन केलेल्या शिवसेनेच्या आंदोलकांवर कारवाई होणार का ?
मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? भाजपा नेत्याचा खडा सवाल
कंगना राणावतला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही ; गृहमंत्री संतापले
ना डरूंगी ना झुकूँगी’ म्हणत कंगना रनौत मुंबईला रवाना !
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. वडिलांमुळे संपत्ती मिळू शकते पण सन्मान तुम्हालाच कमवावा लागतो ; कंगनाची मुख्यमंत्री ठाकरेंवर घणाघाती टीका InShorts Marathi.

कंगनाचा पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला ; बाळासाहेब ठाकरेंबद्दल म्हणाली…

Previous article

‘टीकेसाठी मुद्दा शोधणं आणि टीका करणं हाच सध्या विरोधी पक्षाचा अजेंडा ‘ ; रोहित पवार संतापले

Next article

You may also like

Comments

Comments are closed.