मुख्य बातम्या

कोबीला भावच नाही ;शेतकऱ्याने फिरवला सात एकर शेतीवर नांगर

0

अरविंद सोनवणे यांनी कोबीची लागवड केली. बऱ्यापैकी पाणी मिळाल्याने कोबीची 1 लाख 65 हजार रुपयाची रोपं विकत घेतली. खतं, औषधं, फवारणी, मजुरी असा सर्व मिळून जवळपास दोन लाख 85 हजार रुपये खर्च आला.  माल काढणीला आला आणि पहिल्याच तोड्यात 100 किलो माल त्यांनी बाजारत विक्रीला पाठविला. पण त्याला अवघा 2 ते 3 रुपये किलो असा भाव मिळाला. ज्या गाडीतून माल भरुन पाठविला त्या गाडीच्या भाड्याचे पैसेही वसूल झाले नाहीत. उलट त्यात खिशातून पैसे भरावे लागले. शेवटी काळजावर दगड ठेवून आणि सरकारच्या नावाने मिऱ्या वाटत शेतकरी अरविंद सोनवणे यांनी साडेसात एकरात उभ्या कोबीच्या पिकात नांगर फिरवला.

Loading...

पुणेकर सावधान..!! रुपाली, वैशाली, कॅफे गुडलकचे चाहते… नक्की वाचा ही बातमी

Previous article

गुटखा विक्रेत्यांवर आता आयपीसी अंतर्गत गुन्हा : सर्वोच्च न्यायालय

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *