Royal politicsटॉप पोस्ट

शेतकर्‍यांच्या संतापाचा पुन्हा उद्रेक, होईल का मागण्याची पूर्तता पूर्ण?

0

नवी दिल्ली :-

देशभरातील  शेतकरी १० दिवस संपावर गेले आहेत. १ जूनपासून राष्ट्रीय किसान सभेच्या अंतर्गत  महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक, केरळ, राजस्थान, जम्मू कश्मीर, हरियाणा, पंजाब या राज्यातील शेतकर्‍यांनी संप पुकारला आहे. किमान आधारभूत किंमत, सरसकट कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी या मागण्या  घेऊन  शेतकरी रस्त्यांवर उतरले आहेत.

Loading...

महाराष्ट्रात  किसान क्रांती मोर्चामध्ये सहभागी असलेल्या २८ संघटनांनी मागील वर्षी  एक जूनपासून संप सुरू केला होता.  या संघटनांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी  कर्जमाफीसह अन्य निर्णयांची घोषणा केल्यावर किसान क्रांती सभेच्या सुकाणूसमितीच्या प्रतिंनिधींनी संप मागे घेतला होता. आमच्या  ७० टक्के मागण्या पूर्ण झाल्या असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.

परंतू संपूर्ण कर्जमाफीचे फक्त आश्वासन नको, निर्णय घ्या अशी मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आणि संप असाच पुढे चालू राहिलं असे जाहीर करण्यात आले होते.

महाराष्ट्रात शेतकरी संप चांगलाच भडकला-

मागण्या पूर्ण होईपर्यंत शहरांतील शेतमालाचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय शेतकरी संघटनांकडून घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडून शेतमालाची विक्री बंद करण्यात आली असून मार्केटमध्ये देखील शेतमालाची आवक कमी झाली आहे. यामुळे शहरातील भाजीपाला महागला आहे.  सातारा, नगर, शिर्डीमध्ये शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून आंदोलने केली. कोल्हापूर मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल विक्री बंद पाडण्याचा प्रयत्न शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. शेतकरी आपला शेतमाल रस्त्यावर टाकून संताप व्यक्त करीत आहे. शहराच्या दिशेने दूध आणि भाजीपाला घेऊन जाणारी वाहने अडविण्यात येत आहे. राज्यातील संप भडकत चालला असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. संपाला हिंसक वळण लागू नये, यासाठी पोलिसांकडून महामार्गावर बंदोबस्तात वाढवण्यात आला आहे.

पंजाब, हरियाणा मध्ये  ही शेतकरी संपाचा  उद्रेक

पंजाबमधील शेतकऱ्यांनी शहरातील भाजीपाला, दूध आणि इतर वस्तूंची विक्री बंद केली आहे. पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा  संपाला चांगला प्रतिसाद असल्याचे भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष बलबीर सिंग राजावाल यांच्याकडून सांगण्यात आले.

6 जून रोजी मंदसौर येथे शेतकरी संघटनेकडून  स्मरणोत्सव कार्यक्रमाची आयोजन करण्यात येणार आहे, तेथे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शेतकर्‍यांना संबोधित करतील असे सांगण्यात आले आहे.

मध्यप्रदेशात देखील शेतकर्‍यांकडून संताप व्यक्त

राष्ट्रीय किसान महासंघचे संयोजक शिवकुमार शर्मा यांनी सांगितले की “रोजच्या जीवनात शेतकरी किती महत्वाचा आहेत हे शहरातील लोकांनी समजून घ्यावे. म्हणून आम्ही शहरातील शेतमालाचा पुरवठा बंद केला आहे. जर कोणी गावात येऊन भाजीपाला खरेदी करणार असेल तर त्यांचे स्वागतच असेल.”

मध्यप्रदेशात सरकारकडून संपाचा प्रभाव पाहता सावधगिरीचा उपाय म्हणून 15,000 पोलीस कर्मचार्‍यांना तैनात  केले आहे.

महाराष्ट्रातील पुणतांबे येथून सुरू झालेल्या संपला १ वर्ष पूर्ण-

सरसकट कर्जमाफी , स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी याशिवाय इतर मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्या यासाठी पुणतांबे आणि राज्यभरातील शेतकरी मागील वर्षी जून मध्ये  संपावर गेले होते त्याला  या महिन्यात १ वर्ष पूर्ण झाले.

त्यावेळच्या मागण्या

सरसकट कर्जमाफी , शेतीमालाला हमी भाव, सिंचन व तुषार सिंचनासाठी १०० टक्के अनुदान मिळावे, कृषीपंपासाठी मोफत वीज व शेतीला पाणी मिळावे, शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षांनंतर पेन्शन योजना लागू करावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी या मागण्या करण्यात आल्या होत्या.

 

Loading...

नोटबंदीनंतर नोंदणी रद्द केलेल्या 73000 कंपन्यांनी जमा केले 24000 कोटी रूपये

Previous article

नितीश कुमार करणार बिहारमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचे नेतृत्व

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *