टॉप पोस्ट

का करत आहेत अनेक राज्यातील शेतकरी आंदोलन ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

0

नवी दिल्ली :-

मागील काही दिवसांपासून अनेक राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संपावर गेला आहे. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा व इतर अनेक राज्यात शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. 1 जून पासून अनेक राज्यात शेतकरी संपावर गेले असल्याने दैंनदिन जीवनावर देखील त्याचा परिणाम झाला आहे. दूध व भाजीपाला देखील महागला आहे.

Loading...

भारतामध्ये अनेक वेळा शेतकरी आंदोलने झाली आहेत व त्यांच्या मागण्या देखील नेहमीच्याच असतात. पण सरकारने त्या मान्य न केल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा आंदोलन करावे लागते. संपुर्णपणे कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, स्वामीनाथन कमिटीच्या शिफारसी लागू करणे, तसेच फळे, भाजीपाला, दुध यांना खर्चापेक्षा दीडपट अधिक हमीभाव देणे या सारख्या अनेक मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत. या वेळेस देखील याच मागण्या घेऊन शेतकरी आंदोलन करत आहेत.

या वेळेचे आंदोलन इतर आंदोलनापेक्षा वेगळे –

या वेळेचे आंदोलन इतर आंदोलनापेक्षा वेगळे आहे. याची अनेक कारणे आहेत. प्रत्येक वेळेस होणारे आंदोलन हे त्या त्या  संघटनांच्या क्षेत्रापर्यंत मर्यादित राहत असे. काही वेळा त्यांच्या मागण्या मान्य केल्या जात असे तर काही वेळा आंदोलन मोडून काढण्यात येत असे. या वेळेस मात्र राष्ट्रीय किसान महासंघाच्या नेतृत्वाखाली देशभरातील 130 पेक्षाही अधिक संघटना आंदोलन करत आहेत. तसेच या वेळेस 22 राज्यातील शेतकरी स्वतःच्या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरला आहे. यामध्ये महाराष्ट्र,  पंजाब, दिल्ली, मध्यप्रदेश, हरियाणा, उत्तरप्रदेश,  बिहार, पश्चिम बंगाल या सारख्या अनेक राज्यांचा समावेश आहे.

1 जून पासुन सुरू असलेले आंदोलन हे 10 जून दुपारपर्यंत सुरू राहणार आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागण्या –

1) शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करावी.

2) उत्पादन खर्चापेक्षा दुप्पट मिनिमम सपोर्ट प्राइज (MSP) असावी.

3) शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षांनंतर पेन्शन योजना लागू करावी.

4 ) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी.

5) शेतीमालाला हमीभाव, सिंचन व तुषार सिंचनासाठी १०० टक्के अनुदान मिळावे.

6) कृषीपंपासाठी मोफत वीज व शेतीला पाणी मिळावे.

नाशिक ते मुंबई लाॅंग मार्च – 

मार्च 2018 मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अनेक मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई180 किमीचा लाॅंग मार्च काढला होता. त्यावेळेस देखील शेतकऱ्यांच्या याच मागण्या होत्या व सरकारकडून काही मागण्या मान्य देखील करण्यात आल्या होत्या.

महाराष्ट्रातील पुणतांबे येथून सुरू झालेल्या संपला १ वर्ष पूर्ण-

सरसकट कर्जमाफी , स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी याशिवाय इतर मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्या यासाठी पुणतांबे आणि राज्यभरातील शेतकरी मागील वर्षी जून मध्ये  संपावर गेले होते त्याला  या महिन्यात १ वर्ष पूर्ण झाले

मध्यप्रदेश व भाजपशासित राज्यांमधील आंदोलन – 

या वर्षी मध्यप्रदेशमध्ये निवडणूका असल्याने या आंदोलनाला मध्यप्रदेशमध्ये महत्त्व प्राप्त झाले आहे.  मध्यप्रदेशात सरकारकडून संपाचा प्रभाव पाहता सावधगिरीचा उपाय म्हणून 15,000 पोलीस कर्मचार्‍यांना तैनात केले आहे.

तसेच इतर राज्यांमध्ये देखील शेतकऱ्यांनी दूध व भाजीपाला रस्त्यावर टाकून संताप व्यक्त केला आहे. पंजाब व हरियाणा मध्ये देखील आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

आंदोलनामुळे करोडोंचे नुकसान – 

काद्यांची सर्वात मोठी बाजार असलेल्या महाराष्ट्रातील लासलगाव इथेच आतापर्यंत 100 कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच शेतमालाची आवाक देखील मंदावली आहे.

 

Loading...

मी शेतकर्‍यांच्या पाठीशी; माझ्या ट्विटचा विपर्यास: रवीना टंडन

Previous article

गुजरातमध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात, पायलटचा मृत्यू

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *