Royal Entertainmentमुख्य बातम्या

चाहत्याने सिमकार्डवर रेखाटला सोनू सूदचा फोटो; सोनूने दिला ‘भन्नाट’ रिप्लाय

0

जगभरासह भारतामध्ये देखील कोरोना संकटाने थैमान घातले आहे. कोरोना या अतिसंसर्गजन्य विषाणूला वेळीच अटकाव करण्यासाठी भारतात देशव्यापी लॉक डाऊन लागू करण्यात आला होता. कोरोनाला रोखण्यासाठी लॉक डाऊनचा निर्णय योग्यच असला तरी त्यामुळे अनेकांना गंभीर समस्यांना सामोरे जावं लागत होत.
लॉक डाऊनच्या ‘त्या’ अवघड काळात एक नाव मात्र सदैव चर्चेत राहील. ते नाव होत अभिनेता सोनू सूद याचं. सोनुने लोक लॉक डाऊनमध्ये अडकून पडलेले असताना, त्यांची पायपीट होत असतानाच एखाद्या देवदूताप्रमाणे त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी मदत केली.
सोनूच्या याच दिलदारपणामुळे तो समाज माध्यमांवर खरा हिरो ठरला आहे. त्याचे फॅन्स सातत्याने सोनूला काही ना काही बनवून त्याची छायाचित्र पोस्ट करत असतात. सोनूही त्यांना मनापासून दाद देत असतो. अशातच आता असाच एक किस्सा घडला असून सोनूच्या एका चाहत्याने त्याचे चित्र अक्षरशः सिम कार्डवर रेखाटलं आहे.
त्याबाबतचा फोटो चाहत्याने सोनूला टॅग करत समाज माध्यमांवर पोस्ट केला असून आपल्या फॅनच्या या भन्नाट कलाकृतीला सोनूनेही भन्नाट रिप्लाय दिला आहे.
चाहत्याने सिम कार्डवर रेखाटलेला तो फोटो सोनू सूदने रिट्विट केला असून सोबतच त्याने ‘१०जी’ असं कॅप्शन लिहलं आहे. दरम्यान, सोनूच्या या भन्नाट रिप्लायला त्याचे चात्यांकडून उदंड पसंती मिळत असल्याचं दिसतंय.
The post चाहत्याने सिमकार्डवर रेखाटला सोनू सूदचा फोटो; सोनूने दिला ‘भन्नाट’ रिप्लाय appeared first on Dainik Prabhat.

…म्हणून NCB रियाच्या कस्टडीची मागणी करणार नाही

Previous article

कुटुंबियांनीच केले अर्धमेला

Next article

You may also like

Comments

Comments are closed.